लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएन्ट्स यांच्यात 21 वा सामना खेळवला जाणार आहे.आयपीएलचा (IPL)21 व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. दोन्ही संघांमधील हा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनऊ या सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करेल, तर गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करणारा गुजरातचा संघ पुनरागमन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यश ठाकूरच्या कमालीच्या गोलंदाजीच्या (IPL)प्रदर्शनामुळे लखनऊने गुजरात टायटन्सला 33 धावांनी पराभूत केलं आहे. हा लखनऊचा गुजरातवर पहिलाच विजय आहे.
16 व्या ओव्हरमध्ये नवीन उल हकने उमेश यादवला 2 धावांवर बाद केलं आहे. गुजरात टायटन्सच्या जिंकण्याच्या आशा हळू-हळू मावळत चालल्या आहेत
15 व्या ओव्हरमध्ये गुजरातने विजय शंकरची विकेट गमावली आहे. यश ठाकूरच्या बॉलिंगवर विजय शंकर हा 17 धावा बनवून बाद झाला आहे. ओव्हरच्या 5 व्या बॉलवर गुजरातने राशिद खानची विकेटपण गमावली आहे, राशिद हा शून्यावर बाद झाला, 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरातची स्थिती 93-7 अशी आहे.
13 व्या ओव्हरीत क्रुणाल पंड्याने दर्शन नालकंडेला 12 च्या स्कोरवर बाद केलं आहे. पाचव्या विकेटनंतर गुजरातची स्थिता आणखी वाईट झाली आहे. दर्शनच्या विकेटनंतर तेवतिया फलंदाजी करण्यासाठी आला आहे.
10 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरातचा स्कोर 67-4 असा आहे. शंकर आणि नालकंडे मैदानात खेळत असून आता गुजरातला येथून एका चांगल्या भागीदारीची गरज आहे.
क्रुणाल पांड्याने 9 व्या ओव्हरमध्ये साई सुदर्शनला 31 च्या स्कोरवर बाद केलं आणि यानंतर लगेचचं याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर शरतला दोन धावांवर बाद करत मॅचवर मजबूत पकड बनवली आहे.
रवी बिश्नोईने आपल्या पहिल्या आणि इनिंगच्या 8 व्या ओव्हरमध्ये केन विलियम्सनची अनोखी कॅच पकडत केवळ 1 च्या स्कोरवर बाद केलं आहे.
यश ठाकूरच्या 6 व्या ओव्हरीत गुजरातने शुभमन गिलच्या स्वरूपात मोठी विकेट गमावली आहे. शुभमन हा 19 धावा करून तंबूत परतला.
5 ओव्हरनंतर गुजरात टायटन्स मजबूत स्थितीत दिसत आहे. सुदर्शन-गिलचा भागेदारी मजबूत दिसत असून गुजरातचा स्कोर 47-0 असा आहे.
लखनऊ सुपर जाएंट्स 20 ओव्हरनंतर 163-5 या स्थितीत आहे. लखनऊकडून स्टॉयनिस 58, राहूल 33, पूरन 32, तर बदोनीने 20 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सची गोलंदाजी आज कमालीची होती, गुजरातकडून उमेश यादवने 2, दर्शन नालकंडे 2 आणि राशिद खानने एक विकेट घेतली आहे, तर बाकी गोलंदाज ही किफायताशीर ठरले आहेत.
आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, गुजरातची इनफॉर्म फलंदाजी ही लखनऊने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करू शकते की नाही?
हेही वाचा :
कोल्हापूर पोलीसांनी सापळा रचून अवैध मद्यसाठा केला जप्त
“त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्…”; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव
‘मला माफ करा पण, ‘या’ दोन खेळाडूंसोबत…’, रोहित शर्माने सांगितलं हॉटेल रुम शेअरिंगचं सिक्रेट