राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीत पहिलीवहिली प्रचारसभा घेताना अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत मुख्यमंत्रिपदाचे (Chief Ministership) संकेत दिले होते. देवेंद्र फडणवीसांना विजयी करणं, ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असं वक्तव्य अमित शाहांन शुक्रवारी सांगलीतल्या सभेत केलं होते. मात्र, महायुतीच्या इतर दोन पार्टनर्सनी म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अमित शाहांच्या सूरात सूर मिसळले नव्हते. आणि आता अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाबाबत थोडासा वेगळा सूर आळवल्या दिसून आले. निकालानंतर मुख्यमंत्रिपदादाबाबत तिन्ही पक्ष बसून ठरवू अशी भूमिका अमित शाहांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबाबतच्या भूमिकेत अचानक बदल का केला, असावा याची चर्चा रंगली होती.
दरम्यान, रविवारी मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये रविवारी अमित शाह, मुख्यमंत्री (Chief Ministership)एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. दुपारी साधारण 12.15 च्या सुमाराला ही बैठक सुरू झाली आणि 1 च्या सुमाराला संपली. बैठकीत सुरूवातीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवार यांना बैठकीत का सामील करुन घेतले नाही, असे प्रश्न उपस्थित झाले. मात्र, त्यानंतर अजित पवार बैठकीत सामील झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चौघांमध्ये 15 ते 20 मिनिटं बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेतला. विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, अशी सूचना अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मुंबईतील मालवणी परिसरात सभा होणार आहे. याठिकाणी भाजपचे विनोद शेलार निवडणुकीच्या रिंगणात असून हा परिसर मुस्लीमबहुल आहे. राजे शहाजी मैदानावर आज रात्री 9 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोखंडवालामध्ये वर्सोवा आणि गोरेगाव विधानसभेसाठी रात्री 8 वाजता फडणवीसांची सभा होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मालाड मालवणीत रोहिंग्या आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीवर भाजपकडून सातत्याने टीका केली जाते. धर्मांतर कायद्यासंदर्भात घोषणेनंतर मालाडमध्ये फडणवीसांच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ‘बटेंगे कटेंगे’वर फडणवीस पुन्हा बोलणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा :
पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 19 आणि 20 तारखेला School Bus सेवा बंद कारण…
…तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा
आता नोकरीसाठी घर, गाव सोडण्याची गरज नाही! महाराष्ट्रात लवकरच ‘वर्क फ्रॉम होमटाऊन’ धोरण?