भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केळीच्या पानांवर जेवायला वाढण्याची(health) परंपरा फार जुनी आहे. भारतात कित्येक वर्षांपासून ही परंपरा प्रचलित आहे. आज ही दक्षिण भारतात अनेकांना केळीच्या पानांवर वाढलेले जेवण खायला आवडते. त्या राज्यांमधील अनेक लोक आजतागायत ही परंपरा पाळत आहेत.
दक्षिण भारतीय लोक भांड्यांऐवजी केळीच्या पानात(health) जेवायला देतात आणि खातात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आज आपण केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाचे सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत? ते जाणून घेणार आहोत.
पचनक्षमता सुधारते
केळीच्या फळासोबतच केळीची पाने देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केळीच्या पानांमध्ये पचन आणि विषाणू नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे, आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
मधुमेहापासून बचाव
केळीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या शिवाय, केळीच्या पानांमुळे मधुमेह देखील नियंत्रित राहतो आणि त्याचा धोका ही कमी होतो. त्यामुळे, ज्या लोकांना मधुमेह आहे, त्या लोकांनी केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाचे अवश्य सेवन करावे.
जीवनसत्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत
केळीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, ए यांचे विपुल प्रमाण आढळते. यासोबतच कॅल्शिअम, पोटॅशिअमसारखी पोषकतत्वे आणि खनिजे यांचे भरपूर प्रमाण आढळते. हे सर्व पोषकघटक आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात.
वजन कमी करण्यात करते मदत
केळीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि फायबर्सचे विपुल प्रमाण आढळते. ज्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. याशिवाय, आपली भूक नियंत्रित ठेवण्यासही यामुळे मदत होऊ शकते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्या लोकांनी केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाचे जरूर सेवन करावे. यामुळे, त्यांना वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा महामार्गाचे काम कोल्हापुरात पाडले बंद
उद्यापासून इचलकरंजीसह २१ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर
धोनी या दिवशी घेणार निवृत्ती, BCCIही रोखू शकणार नाही- दिग्गजाचा दावा