बिल्डर विशाल अगरवालला बेडय़ा; पब मालक कोठडीत

दारूच्या (alcohol)नशेत भरधाव मोटार चालवून दोघांचा बळी घेणाऱया अल्पवयीन मुलाचा बाप असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संभाजीनगरमधून अटक केली आहे. हिट अॅण्ड रन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यावसायिक पसार झाला होता. मात्र, सोशल मीडिया, स्थानिक नागरिक, पत्रकारांनी मांडलेल्या सडेतोड भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाला झुकावे लागले आहे. त्यासोबतच अल्पवयीनाला मद्य पुरविणारे बार मालक, व्यवस्थापकांनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.

बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (रा. वडगाव शेरी) हॉटेल काझीचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप रमेश सांगळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(alcohol)
कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास विनानंबर असलेल्या अलिशान मोटार चालकाने दुचाकीस्वाराल धडक दिली. त्यामुळे गंभीररीत्या जखमी झालेल्या दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांना जीव गमवावा लागला. अपघातानंतर येरवडा पोलिसांनी मद्यधुंद अल्पवयीनाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी भेटीसाठी गेलेल्या आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला पिझ्झा बर्गरची पार्टी दिली.

पोलिसांनी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करून बालन्यायालयात हजर केले. मात्र, त्याला अवघ्या 12 ते 15 तासांत जामीन मिळाला. या प्रकरणात पोलिसांसह आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून गुह्यात सेटिंगचा डाव नागरिकांनी उधळून लावला.
आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतीश गोवेकर, एसीपी सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, महेश बोळकोटगी, भरत जाधव, एपीआय राजेश माळेगावे, एपीआय अनिकेत पोटे यांनी केली.

हेही वाचा :

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का; लोकसभा संपर्क प्रमुखांचा पक्षाला रामराम

सांगलीत भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, ४ ऊसतोड मजुरांचा मृत्यू

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू; अवघ्या साडेपाच तासांत गाठा अयोध्या