कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियान आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी आयोजित केलेल्या विशेष बैठकीचे आयोजन वृंदावन मंगल कार्यालय, कुरुंदवाड येथे करण्यात आले. या बैठकीचे मार्गदर्शन कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. रविंद्र माने साहेब आणि उपजिल्हाप्रमुख श्री. सतिश मलमे साहेब यांनी केले.
शिवसेना पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित या विशेष बैठकीत शिरोळ तालुक्याच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या अभियानाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील जनतेपर्यंत थेट पोहोचणे आणि शिवसेनेच्या कार्याची माहिती देणे असे होते. यावेळी जिल्हाप्रमुख रविंद्र माने आणि उपजिल्हाप्रमुख सतिश मलमे यांनी शिवसेना पक्षाच्या आगामी योजना आणि मोहिमा याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीस शिरोळ तालुकाप्रमुख उदय झुटाळ, हरी पाटील, युवासेना अध्यक्ष राकेश खोंद्रे, छायाताई सूर्यवंशी, माधुरी टाकारे वहिनी यांसह शिरोळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले.