लाडकींच्या खात्यात जानेवारीत ₹१५०० आले, पण फेब्रुवारी मार्चमध्ये नाही नेमकं कारण काय

तुम्ही आता एकलाडकी बहीण योजनेत मार्च महिन्याचे १५०० रुपये (depositing)महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा हप्ता एकाच महिन्यात देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे आलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेत जवळपास ९ लाख महिलांना पैसे आलेले नाहीत. त्याचसोबत अजून ५० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

या योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यात जानेवारी महिन्यात ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेत. तर फेब्रुवारी महिन्यात ४ लाख महिलांचे अर्ज बाद केले (depositing) आहे. या ९ लाख महिलांना पैसे मिळणार नाहीत. अजून मार्च महिन्याच्या पडताळणीत किती महिला बाद झाल्या आहेत याबाबात माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या महिन्यात बाद झालेल्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना जानेवारीचा हप्ता आलाय. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही. याचाच अर्थ असा की, तुमचा अर्ज कदाचित बाद केलेला (depositing)आहे. निकषांबाहेर जाऊन जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा झाले की नाही ते चेक करा. तुम्ही बँकिंग अॅपवर जाऊन खात्यात बॅलेंस किती आहे हे चेक करा. त्यावरुन पैसे जमा झालेत की ते कळेल. याचसोबत ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीवरुनही तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही ते समजेल.

हेही वाचा :

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

आता 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार; पण जुन्या नोटा…

महिलांनी स्वत:चं नाव कसं लिहायचं? महाराष्ट्र शासन लवकरच आणणार नवा जीआर