१६ लाख बहिणी ७५०० हजारांपासून वंचित; कारण फक्त…

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजने(yojna)अंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता ही रक्कम वाढणार असल्याचे आश्वास महायुती सरकारने केले होते. महायुती सरकार महिलांना लवकरच २१०० रुपये देणार आहे. आतापर्यंत २.६ कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यातील २.५ कोटी महिलांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे.

लाडकी बहीण योजने(yojna)अंतर्गत लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. ज्या महिलांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे १६ लाख महिलांना हप्ता मिळाला नाही. फक्त २.३ कोटी महिलांना या योजनेचे पैसे मिळाले.

आतापर्यंत सरकारने १७ हजार कोटी रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. या योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जांची पुर्नतपासणी होणार आहे. ज्या महिलांनी आधार लिंक केले नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. आधार लिंक असेल तर तुमची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. त्यामुळेच सरकारने महिलांना आधार लिंक करायला सांगितले आहे.

महायुती सरकार महिलांना लवकरच २१०० रुपये देणार आहेत. हे २१०० रुपये कधीपासून देण्यात येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झाल्यानंतर महायुती सरकार महिलांना २१०० रुपये देऊ शकते.

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा

इचलकरंजीत बँक अधिकाऱ्यांसाह वकिलावर गुन्हा दाखल

सरकारच्या ‘या’ भन्नाट योजनेचा लाभ घ्या, 3 लाखांचं कर्ज मिळवा

नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 5.48 टक्क्यांवर, सर्वसामान्यांना दिलासा