आपण अजब प्रेमाच्या अनेक गजब कहाण्या पाहत असतो.(love) त्यांच्याबद्दल ऐकत असतो. पण चीनमध्ये एक अशी प्रेमकहाणी घडली आहे जी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारी आहे. 40 वर्षीय ‘हू’ नावाची एक महिला चीनमध्ये घोटाळेबाजाच्या (Fraud) प्रेमात पडली आणि त्याच्याकडून या महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक झाली.
आश्चर्यकारक बाब म्हणजे, फसवणूक झाल्यावरही या महिलेने त्या घोटाळेबाजाची तक्रार न करता त्याची बाजू घेतली आणि त्याला मदत करण्यासाठी स्वतःही जवळपास शंभर लोकांची फसवणूक केली.
फसवणुकीची प्रेमकहाणी
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हू ही (love)म्यानमारची रहिवासी आहे. मे 2023 मध्ये ती ‘चेन’ नावाच्या व्यक्तीला डेटिंग ॲपवर भेटली. चेनने हूला सांगितले की तो एक यशस्वी व्यवसायिक आहे आणि त्याच्याकडे उच्च परतावा देणारे गुंतवणूक खाते आहे. त्याच्या गोड बोलण्याला भुलून हू यांनी त्याच्या खात्यात 11 लाख रुपये गुंतवले.
काही दिवसांनंतर हू यांना खात्यातून पैसे काढता आले नाहीत. तिला लवकरच कळले की ती फसवणुकीची शिकार झाली आहे.
चेनने मदत करण्याची नाटकबाजी केली
फसवणुकीची माहिती झाल्यावर चेनने हूला मदत करण्याचे नाटक केले. त्याने तिला सांगितले की तो स्वतःही या घोटाळ्यात अडकला आहे आणि तिला पैसे परत मिळवण्यासाठी टोळीला पैसे द्यावे लागतील.
हू आणि चेनची ऑनलाइन मैत्री
चेनच्या गोड बोलण्याला भुलून हू यांनी त्याला पैसे दिले. यानंतर दोघांमध्ये ऑनलाइन मैत्री सुरू झाली आणि लवकरच ती प्रेमात बदलली. काही महिन्यांनंतर दोघेही एकमेकांना पती-पत्नी मानू लागले.
हू आणि चेन यांच्या गैरकृतीची माहिती पोलिसांना मिळाली आणि हूला अटक करण्यात आली. तिने आपला गुन्हा कबूल केला.
स्टॉकहोम सिंड्रोम
तज्ज्ञांच्या मते, हू यांना ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नावाच्या मानसिक आजाराची लक्षणे दिसत होती. या आजारात, बळी आपल्या अपहरणकर्त्याशी सहानुभूती बाळगू लागतो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो.
या घटनेतून आपण शिकले पाहिजे की, ऑनलाइन मैत्री आणि गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अज्ञात व्यक्तींवर विश्वास ठेवून आपण स्वतःला धोक्यात टाकू नये.
हेही वाचा :
विधानसभेपूर्वी महायुतीत स्फोट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजप नेत्यांची मागणी?
मोठी बातमी! काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा; अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं
प्रेमाचा भयानक शेवट, प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; थरारक घटनेचा VIDEO