2024 जगातील सर्वात उष्ण वर्ष? संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

उष्णतेच्या लाटा, भयानक वादळे आणि अचानक आलेला पूर या घटनांमुळं यंदा जगभरात हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे. जागतिक तापमानवाढीमुळं ( temperature)या घटनांमध्ये वाढ झाली आहे. युरोपीयन हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, 2024 आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष नोंदवण्यात येणार आहे. वर्षभरातील जागतिक सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअस जास्त असण्याची शक्यता आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमानवाढ( temperature) हा धोक्याचा इशारा आहे. पुढील आठवड्यात अजरबैजान येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान कॉन्फ्रेस COP29 च्या आधीच आलेल्या या रिपोर्टने चिंता वाढवली आहे. BBCच्या रिपोर्टनुसार, रॉयल मेट्रोलॉजिकल सोसायचीचे अध्यक्ष लिज बेंटले यांनी म्हटलं आहे की, आत्ताच आलेल्या अहवालानुसार COP29 मध्ये सरकारकडून कठोर इशारा देण्यात आला आहे. येत्या काही काळात तापमानात आणखी वाढ होऊ शकते. तापमानवाढ रोखण्यासाठी तात्काळ कारवाईची गरज भासू शकते.

2024 च्या पहिल्या 10 महिन्यांत जागतिक तापमान इतके वाढले आहे की आता उरलेल्या दोन महिन्यांत तापमान वाढीतील घसरणच हा रेकॉर्ड बनवण्यापासून रोखू शकतो. युरोपीय कोपरनिकस जलवायु परिवर्तन विभागाच्या अहवालानुसार, 2024मध्ये तापमान पूर्व-औद्योगिक काळापेक्षा कमीत कमी 1.55 अंश सेल्सिअस अधिक असेल.

पूर्व औद्योगिकचा अर्थ 1850-1900 हा एक मानक काळ आहे. या काळात माणसाने औद्योगिक क्रांती केली. मात्र, एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. पृथ्वीवर तापमान वाढ होण्यास सुरुवात झाली. अलीकडेच आलेल्या शक्यतांनुसार, 2014 मध्ये 1.48 सेल्सियसचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीच हा नवा रेकॉर्ड तयार झाला होता.

दरम्यान, हिवाळा सुरू झाला असला तरीही नोव्हेंबर महिन्यात राज्यासह देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही. तमिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती डिसेंबरअखेर सक्रिय होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी (१ नोव्हेंबर) नोव्हेंबर महिन्याचा अंदाज जाहीर केला.

हेही वाचा :

बस चालवता, चालवता ड्रायव्हर अचानक हार्ट अटॅकने

कोल्हापूर “उत्तर” मध्ये आता प्रतिष्ठेचा “प्रश्न”

घटस्फोटाच्या अफवांमध्ये अभिषेक ऐश्वर्या नव्या सिनेमात येणार एकत्र?