गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा(reservation) प्रश्न प्रलंबित आहे. अशातच आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटील मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधत आमरण उपोषण सुरू करत आहेत. अशातच आता त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पून्हा एकदा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरु होत असल्याची घोषणा लक्ष्मण हाकेंनी केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की. आंदोलनकर्ते पाटील मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने आमदार पाडण्याची भाषा केली जात आहे. मात्र आता लक्ष्मण हाके यांनी देखील ओबीसींकडून मराठवाड्यात तब्बल 25 आमदार पाडण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
या सर्व बाबींचा अर्थ असा की, आरक्षणासाठी सुरू झालेली लढाई आता आगामी विधानसभेत आमदारांना पाडापाडीची बनताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, सामाजिक आरक्षणाचा(reservation) लढा आता राजकीय होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी काय उलथापालथ होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.
ओबीसी नेते व उपोषणकर्ते लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील अगदी त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच ठिकाणी ओबीसी समाजाचे देखील उपोषण सुरू झालेले सरकारला दिसेल. तसेच मनोज जरांगे यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच ताकदीने ओबीसी समाज उत्तर देईल.
याशिवाय नुसत्या मराठवाड्यातच तब्बल 25 आमदार ओबीसींकडून पाडण्यात येणार असल्याचं हाके म्हणाले आहेत. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे यासंदर्भात आमच्याकडे त्या 25 आमदारांची यादी देखील तयार आहे. त्यामुळेच आता काही आमदार विधानसभा निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेत उतरू लागले असा गौप्यस्फोट देखील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
हेही वाचा:
लाडकी बहीण योजनेत चक्क 12 पुरुषांचे अर्ज; नेमकं काय घडलाय प्रकार?
शांत चालत आला अन् लगातार 10 राउंड फायर केले; गोळीबाराचा थरारक व्हिडिओ व्हायरल
स्वतः 11 हजार कमवतेय अन् नवरा हवा 2.5 लाख कमावणारा! घटस्फोटित महिलेचा बायोडेटा Viral