इचलकरंजी, 13 सप्टेंबर 2024: शहरातील यंत्रमागधारकांसाठी(machine operators) मोठी दिलासादायक बातमी आली आहे. 27 HP आणि त्यावरील यंत्रमागधारकांना 75 पैसे प्रति युनिट अतिरिक्त सवलत आणि 27 HP खालील यंत्रमागधारकांना 1 ₹ प्रति युनिट सवलत देण्याची योजना अखेर मंजूर झाली आहे. या योजनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री मदन कारंडे आणि आमदार श्री प्रकाश आवाडे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
27 HP वरील यंत्रमागधारकांसाठी (machine operators)75 पैसे प्रति युनिटची सवलत ही मागणी श्री मदन कारंडे यांनी प्रभावीपणे मांडली होती, तर 27 HP खालील यंत्रमागधारकांना 1 ₹ प्रति युनिटची सवलत मिळावी अशी मागणी श्री प्रकाश आवाडे यांनी पुढे नेली होती. या दोन्ही मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी श्री अशोक स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या योजनेची अंमलबजावणी होण्यात राज्याचे मुख्यमंत्री मंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांचा प्रमुख हात असून, त्यांच्या नेतृत्वाखालीच ही योजना मंजूर झाली आणि यंत्रमागधारकांना मोठी सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
सर्व यंत्रमागधारक संघटनांनी एकत्रित प्रयत्न करून ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्यासाठी जोरदार मागणी केली होती. यामुळेच ही योजना यंत्रमागधारकांच्या फायद्याची ठरली आहे. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच आज यंत्रमागधारकांच्या हाती ही सवलत योजना पडली आहे. यंत्रमागधारक संघटनांनी या यशस्वी निर्णयासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
हेही वाचा:
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹१५०० वाढवून ₹३००० होणार; राऊतांची मोठी घोषणा
इचलकरंजीत अटल महोत्सव: जनतेला कमी दरात खेळणी आणि आनंदाचा उत्सव
राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहोत का? जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल