बेधुंद तरुणाचा ‘कार’नामा! दुकानासमोर बसू न दिल्याच्या रागातून ३ दुचाकींना उडवले

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना समोर(anger) येत आहेत. पुण्यातील पोर्शे अपघात, नागपूरमधील मजुरांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमध्ये तरुणाने बेधुंदपणे कार चालवत तीन दुचाकींना उडवल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील(anger) हुपरी इथे एका तरुणाने बेधुंदपणे कार चालवत तीन मोटारसायकली उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुपरी गावात काल रात्री हा अपघाताचा थरार घडला. दुकानाच्या दारात बसण्यास विरोध केल्याचा या तरुणाला राग आला. याच रागातून त्याने सुसाट वेगात गाडी चालवत तीन दुचाकींना धडक दिली.

या धडकेमध्ये तिनही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त जमावाने तरुणाला बेदम चोप दिला. तसेच त्याच्या कारचीही तोडफोड केली. या अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, कोल्हापुर शहरात काही दिवसांपूर्वीच हिट अंड रनची भयंकर घटना समोर आली होती. शहरातील सायबर चौकात भरधाव कारने चार वाहनांना उडवले होते. यामध्ये कार चालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (24-06-2024) : astrology reading

लाल चुडा, भांगात कुंकू ; सोनाक्षीचा रिसेप्शन लूक चर्चेत तर…

माजी केंद्रीय मंत्र्याचा मोठा निर्णय; भाजपला रामराम, आज शरद पवार गटात प्रवेश?