मैदानात घुसले हार्दिक पांड्याचे 3 चाहते, मिठी मारली अन्…

आपल्या देशात क्रिकेटची खूप क्रेझ आहे. क्रिकेटर्सचे लाखात चाहते असतात. त्या चाहत्यांना त्यांचा आवडता क्रिकेटर(Cricketer) भेटावं असं नेहमी वाटतं असते. यासाठी हे चाहते सुरक्षा तोडतात आणि त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटतात. अशा घटना सर्रास बघायला मिळतात.

अलीकडेच असेच काहीसे मुंबई आणि बडोदा यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाहायला मिळाले. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या(Cricketer) बडोद्याचे प्रतिनिधित्व करत होता.

बडोद्याच्या गोलंदाजीदरम्यान हार्दिक पांड्याचे 3 चाहते सुरक्षेला चकमा देत मैदानात घुसले. चाहत्यांनी हार्दिककडे जाऊन त्याला मिठी मारली आणि त्याच्या पायाला स्पर्श केला. दरम्यान सिक्युरिटी येऊन त्या तिघांनाही बाहेर काढायला लागले. मात्र त्यानंतर हार्दिकने मागून सुरक्षा रक्षकांना हातवारे करत या तिघांनाही सोडून द्या, असे सांगितले. त्यांच्या या कृतीचे खूप कौतुक होत आहे. मैदानात बसलेल्या चाहत्यांनीही पांड्याचा जयजयकार सुरू केला.

T20 मध्ये अजिंक्य रहाणेने आपला नवीन फॉर्म सुरू ठेवला आणि 98 धावांची धडाकेबाज खेळी खेळली आणि मुंबईने शुक्रवारी बडोद्यावर सहा गडी राखून विजय मिळवून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. रहाणेने ५६ चेंडूंचा सामना केला होता. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले. मुंबईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत बडोद्याला सात विकेट्सवर १५८ धावांवर रोखले.

हार्दिकच्या चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉ (आठ) लवकर बाद झाल्याने रहाणेच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने कर्णधार श्रेयस अय्यर (३० चेंडूंत ४६ धावा) याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी नऊ षटकांत ७८ धावांची भागीदारी करून बडोद्याच्या गोलंदाजांवर दबाव आणला. अय्यरने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले.

हेही वाचा :

खुशखबर! राधिका आपटेच्या घरी पाळणा हलला, दिला गोड मुलीला जन्म

“क्षणाची चूक अन् जीवघेणा प्रसंग; पाहा धडकी भरवणारा व्हिडिओ”

एकनाथ शिंदेंच्या दोन बड्या नेत्यांना झटका! मंत्रिपदातून पत्ता कट होणार?