बाजारात उतरवणार नव्या ३ कार, CNG ते इलेक्ट्रिक मॉडल करणार लॉन्च

तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची(launched) आहे. मारुती सुझुकी कंपनी बाजारात तीन कार आणत ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये धमाका करणार आहे. कंपनी लवकरच कंपनी भारतीय बाजारात सीएज आणि इलेक्ट्रिक मॉडल कार आणण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करू शकता.

मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार(launched) निर्माता कंपनी असून त्यांची वाहने दोन आऊटलेट्स अंतर्गत विकली जातात. एक अरेना आणि दुसरी नेक्सा. कंपनीची प्रीमियम वाहने Nexa डीलरशिपमध्ये उपलब्ध आहेत. तर मारुती कंपनीने आतापर्यंत २५ लाख कार विकल्या आहेत.

मारुती सुझुकी बलेनोचा या सेलमध्ये ५६ टक्के हिस्सा आहे. एवढेच नाहीतर कंपनीने पंजाबमधील लुधियाना येथे आपले नवीन एरिना आउटलेट सुरू केले असून कंपनी विक्रीच्या आकड्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनी ३ नवीन कार आणणार आहे. मारुती सुझुकी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये नवीन तंत्रज्ञानासह नवीन कार लॉन्च करणार आहे. यामध्ये एक सीएनजी, एक इलेक्ट्रिक आणि एक पेट्रोल कारचा समावेश असणार आहे.

चौथ्या जनरेशनची स्विफ्ट कार लाँच केल्यानंतर मारुती कंपनी आता सीएनजी व्हर्जन लॉन्च करत आहे. ते लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. यात १.२ लीटर ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे सीएनजी किटशी जोडलेले असेल. सीएनजी मॉडेलची पॉवर आणि टॉर्क पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत कमी असेल, परंतु त्याचे मायलेज जास्त असेल.

मारुती कंपनी नवीन डिझायर कार बाजारात आणणार आहे. यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये ही कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये १.२ लिटर, ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे.

मारुती कंपनी पहिली इलेक्ट्रिक एसयूवी eVX ला वर्ष २०२५ वर्षाच्या सुरुवातीस लॉन्च केलं जाईल. या कारमध्ये ADAS तंत्रज्ञान, फ्रेमलेस रीअरव्ह्यू मिरर, रोटरी डायल, फ्लोटिंग सेंटर कन्सोल, ३६० डिग्री कॅमेरा यासारखी वैशिष्ट्ये असतील. यात ६० kWh क्षमतेची बॅटरी असेल. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ५०० किलोमीटरपर्यंतची रेंज मिळेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

इच्छाशक्ती असेल तर गुंडाराज होईल खालसा

कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद

धोनीचं श्वानप्रेम! फादर्स डे निमित्त लेकीनं शेअर केला तो खास Video