32 जणांनी जीव गमावला दारूचा घोट प्राणघातक ठरला; 60 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर!

 तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्यानं 32 जणांचा मृत्यू (death)झाला आहे. तर 60 हून अधिक जणांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भितीहीत्यांनी व्यक्त केली आहे. 

याप्रकरणी 49 वर्षीय (अवैध दारूविक्रेते) के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 200 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली दारू चाचणीसाठी पाठवली असता त्यामध्ये प्राणघातक मिथेन असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आणि ते थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितलं. 

हेही वाचा :

कोहली कामगिरी उंचावणार? ‘अव्वल आठ’ फेरीत आज अफगाणिस्तानशी लढत

नीट परीक्षा रद्द, एनटीएने केली घोषणा.

आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या