3,300 वर्षांपूर्वीच्या जहाजाचा समुद्रात शोध

 इस्रायलच्या किनार्‍यापासून 90 किलोमीटर उत्तरेला समुद्रात 2 हजार मीटर खोलीवर संशोधकांना एका जहाजाचे (ship)अवशेष आढळून आले. हे जहाज तब्बल 3,300 वर्षांपूर्वीचे आहे. या जहाजाच्या अवशेषांमधून अनेक प्राचीन भांडी व अन्य वस्तू मिळाल्या आहेत. कांस्य युगातील या जहाजाची लांबी 40 फुटांची आहे.

गेल्यावर्षी लंडनच्या एका गॅस कंपनीने रोबोच्या माध्यमातून या जहाजाचा छडा लावला होता. आता या जहाजाचा ठावठिकाणा पाहून त्यामधील अनेक वस्तू पाण्याबाहेर काढण्यात आल्या आहेत. भूमध्य समुद्रात इतक्या खोलीवर शोधण्यात आलेले हे सर्वात जुने जहाज ठरले आहे. प्राचीन काळातील नाविक खोल समुद्रातही जलप्रवास करीत होते, हे यावरून दिसून आले. हे जहाज सागरी वादळामुळे किंवा समुद्री चाच्यांच्या हल्ल्यात बुडाले असावे, असा अंदाज आहे.

इस्रायलमधील पुरातन प्राधिकरणाच्या सागरी विभागाचे प्रमुख जेकब शार्विट यांनी याबाबतची माहिती दिली. हा एक महत्त्वपूर्ण शोध असल्याचे त्यांनी सांगितले. या जहाजातील मोठ्या आकाराच्या सुरया किंवा ‘एम्फोरा’ बाहेर काढण्यात आल्या आहेत. या सुरया किंवा जग अंडाकार असून, त्यांची मान अरुंद आहे. या सुरयांना दोन मुठीही आहेत. तेल, मद्य किंवा फळे नेण्यासाठी, साठवण्यासाठी अशा सुरयांचा वापर केला जात असे.

हेही वाचा :

कोल्हापुरात मंगळवारी टॅक्सी,रिक्षा बंद

 भारताचा ‘अव्वल आठ’ फेरीतील दुसरा सामना आज बांगलादेशशी

महामार्गावरील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवले