40000 कोटींचं कर्ज! अनिल अंबानी घेणार मोठा निर्णय, ‘या’ समूहाला विकणार एक कंपनी? 

आशियातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी(Ambani) यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या व्यवसायांवर सध्या कर्जाचा डोंगर आहे. अशातच त्यांनी मोठी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल अंबानी यांनी रिलायन्स कॅपिटल ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुजा समूहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडने अनिल अंबानींची(Ambani) रिलायन्स कॅपिटल ही कंपनी 98.6 अब्ज रुपयांना विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. अशा स्थितीत अनिल अंबानी यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? याबाबतची माहिती पाहुयात.

सूत्रांच्या माहितीनुसार हा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. मात्र, या डीलबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून लवकरच या डीलची घोषणा होऊ शकते. हा करार पूर्ण करण्यासाठी IIHL ने 9,861 कोटी रुपयांची बोली लावली होती. सध्या रिलायन्स कॅपिटलमध्ये सुमारे 20 वित्तीय सेवा कंपन्या आहेत.

RBI ने 30 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडलेल्या रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड बरखास्त केले आणि त्याविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली. त्यावेळी रिलायन्स कॅपिटलवर 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे सांगण्यात आले. इंडसइंड इंटरनॅशनलच्या प्रतिनिधीने अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या खरेदीबाबत कोणतीही विशिष्ट टिप्पणी केलेली नाही. त्याच वेळी, रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2021 मध्ये रिलायन्स कॅपिटलचे नियंत्रण देखील घेतले. रिलायन्स कॅपिटलचे कर्ज फेडता न आल्याने हे करण्यात आले.

एकेकाळी कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानींची परिस्थिती आज बदलली आहे. त्यांच्या मुलांमुळे त्यांची संपत्ती वाढत आहे. अनिल अंबानींच्या कंपनीचा आत्मविश्वास बाजारपेठेत वाढत आहे, त्यामुळेच गुंतवणूकदारही गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे त्यांची संपत्तीही वाढत आहे. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या वाढीनंतर त्यांचे मार्केट कॅप वाढले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या 2023 च्या अहवालानुसार अनिल अंबानींची संपत्ती 250 कोटी रुपये आहे.

हेही वाचा :

ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच

परीक्षेसाठी पत्नी बाहेरगावी गेल्यावर पतीने मेव्हणीसोबत केलं लग्न; नंतर बायकोला व्हिडिओ कॉल केला अन्…