राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (yojana)जोरदार चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारने ही योजना जुलै महिन्यापासून सुरु केली आहे. माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाली होती, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.
यापूर्वी योजनेसाठी(yojana) अर्ज करण्याची तारीख 31 जुलै होती. परंतु नंतर वाढता प्रतिसाद पाहता सरकारने ही मुदत 31 सप्टेंबरपर्यंत ठेवली आहे. सरकारने 14 ऑगस्ट 2024 रोजी सर्व भगिनींना दोन हप्ते जोडून 3000 रुपये पाठवले आहेत. मात्र, काही महिला अशा आहेत, ज्यांना अद्याप एकही रुपया मिळाला नाही. मग यांना पैसे किती आणि नेमके कधी मिळणार?, असे प्रश्न केले जात आहेत.
पण, लाडक्या बहीणींनो काळजी करू नका. कारण, ज्या महिलांना योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रित 4500 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये आलेले आहेत, ते पैसे माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट या महिन्याच्या टप्प्यातील असणार आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे बँक खात्यावर देण्यात आले होते. मात्र आता या योजनेचा दुसरा टप्पा देखील चालू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. आहेत.
मात्र, ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये देखील मिळालेले नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्यात तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम याच महिन्यात दिली जाऊ शकते.
दरम्यान, योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील. लाडकी बहीण योजनेत नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. पण, आता त्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या महिन्यात बहिणी योजनेसाठी नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल.
हेही वाचा:
भाजप आणि अजित पवार गटामध्ये २० जागांवर मतभेद: महायुतीत बंडखोरीची चिन्हे
बारामतीत शिंदे गटाच्या कृतीमुळे राष्ट्रवादीचा संताप; अमोल मिटकरींचा शिंदे गटाला इशारा
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक: युवकांना मानवतेचा मंत्र आणि आंतरभारतीची संकल्पना