HSSC मध्ये ‘या’ अंतर्गत मिळणारे 5 गुण होणार बंद

हरयाणा सरकारने स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेबाबत(exam) काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. हरयाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनने ग्रुप ‘सी’ आणि ग्रुप ‘डी’ मध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी अंतर्गत येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये सामाजिक आर्थिक स्थितीच्या अंतर्गत जे 5 गुण दिले जायचे, त्याबाबत काही बदल करण्यात आले आहेत. हरयाणा सरकारने ग्रुप सी आणि ग्रुप डी अंतर्गत येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये सामाजिक आर्थिक स्थितीच्या अंतर्गत मिळणरे 5 गुण न देण्याचा निर्णय घेतला आहे.

हरयाणा सरकारने हा निर्णय पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाच्या आदेशानंतर घेतला आहे. या निर्णयामुळे आता ग्रुप सी आणि ग्रुप डी अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये 5 गूण मिळणार नाहीत. या परीक्षेच्या(exam) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी पंजाब व हरयाणा हायकोर्टाने आदेश दिले होते. त्याच आधारावर आता 5 गूण न देण्याचा महत्वाचा निर्णय हरयाणा सरकारने घेतला आहे.

काही घटक भरती रोखण्यासाठी प्रयत्न करून तरुणांचे भविष्य खराब करू पाहत आहेत. मात्र तरुणांच्या उजवळ भविष्यासाठी आणि चांगल्या हितासाठी सरकार कटिबद्ध असून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवणार असल्याचे हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हरयाणा सरकारने कॉमन एलिजिलीबिलिटी (CET) परीक्षेबाबत(exam) काही महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे अधिक विद्यार्थ्याना संधी मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने काकरापार गुजरात साइटवर शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी एकूण 284 जागा भरल्या जाणार आहेत. ट्रेड अप्रेंटिससाठी 176 जागा, डिप्लोमा अप्रेंटिससाठी 32 जागा, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 76 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आजपासून अर्ज करता येणार आहे. अर्जाची विंडो आजपासून खुली करण्यात आली आहे. तसेच २१ जानेवारी २०२५ पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे असावे. कमाल वयोमर्यादा ट्रेड अप्रेंटिससाठी 24 वर्षे, डिप्लोमा अप्रेंटिससाठी 25 वर्षे, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 26 वर्षे ठेवण्यात आली आहे. महत्वाची बाब अशी आहे कि सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू असेल. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक अटीनुसार, ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र, डिप्लोमा अप्रेंटिससाठी अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेत डिप्लोमा, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील पदवी किंवा सामान्य शाखेत B.A./B.Sc./B.Com. पदवी आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे. निवड प्रक्रियेत उमेदवारांची प्राथमिक शॉर्टलिस्टिंग त्यांच्या ITI/डिप्लोमा/पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल. तसेच, काकरापार गुजरात साइटपासून 16 कि.मी.च्या परिसरातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. जर दोन उमेदवारांचे गुण सारखे असतील, तर ज्येष्ठ उमेदवाराला (वयोमानाने मोठ्या व्यक्तीला) प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा :

लाडकी बहिण योजना बंद होणार?; ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट!

काय सांगता!, १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार?

महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली..; केजरीवालांचा भाजपवर आरोप