अर्थसंकल्पानंतर शिंदे सरकारचे 6 धडाकेबाज निर्णय!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले(budget) आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत(budget) महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाखांची मदत देणार आहे. 5 एप्रिल 2024 पासून योजना लागू केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय  

  • राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार   (पशुसंवर्धन विभाग)
  • आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख. अपंगत्वासाठी पाच लाख (सार्वजनिक आरोग्य) 
  • शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार (मदत व पुनर्वसन विभाग)
  • दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण ( सामान्य प्रशासन)
  • बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडे तत्वावर ( सामान्य प्रशासन)
  • अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी  16 हेक्टर शासकीय जमीन ( महसूल विभाग)

हेही वाचा :

श्रीलंका दौऱ्याआधी भारताच्या अष्टपैलू खेळाडूने उरकला साखरपुडा

‘बरं झालं करिश्मा कपूरशी लग्न झालं नाही! करीना किमान…’ सैफ अली खानचं मोठं विधान

रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना ऑटोरिक्षाने उडवले, भयानक व्हिडिओ व्हायरल