एका मागोमाग 6 सूर्य एकत्रच उगवले, आश्चर्यकारक दृश्यांनी भरले आभाळ Video Viral

आजवर तुम्ही सोशल मीडियावर अनेक विचित्र किंवा थरारक गोष्टी पहिल्या असतील मात्र आज आम्ही तुम्हाला इथे व्हायरल होत असलेल्या अशा एका वीडेओविषयी सांगत आहोत ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. हे जग अनेक सुंदर दृश्यांनी आणि रहस्यांनी भारलेले आहे असे म्हटले जाते. असेच एक रहस्य आजच्या या व्हायरल व्हिडिओतून(video) उलगडताना दिसून आले आहे. यातील दृश्ये कोणत्या आश्चर्याहून कमी नाहीत. नक्की यात काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.

आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी पाहिल्या आहेत ज्या आपण रोज सारख्याच पाहतो. उदाहरणार्थ, पूर्वेकडून उगवणारा सूर्य, रात्री दिसणारे चंद्र आणि तारे आणि दिवस आणि रात्रीचे अस्तित्व. या नैसर्गिक घटना आपण कधीच बदलताना पाहत नाही. यात काही बदल झाला तर आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. असेच एक दृश्य आताच्या व्हायरल व्हिडिओतून आकाशात दिसून आले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये(video), आकाशात एकाच वेळी एक नाही तर 6 सूर्य चमकताना दिसत आहेत. हे दृश्य असे होते की ते पाहून जो तो व्यक्ती आश्चर्यचकित होऊ लागला. जेव्हा सूर्यमालेत एकच सूर्य आहे, तेव्हा हे 6 सूर्य पृथ्वीवर कसे काय दिसून आले असा प्रश्न सर्वांना पडू लागला. याचे उत्तरही आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

हा व्हिडीओ 2024 चा असून तो चीनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे तुम्हाला केशरी रंगीत आकाशात 6 सूर्य चमकताना दिसतील. यातील एक सूर्य अतिशय तेजस्वी आहे, तर आजूबाजूचे सूर्य किंचित मंद प्रकाशात चमकत आहेत. हा व्हिडिओ वांग नावाच्या व्यक्तीने चेंगडू हॉस्पिटलच्या खिडकीतून टिपला आहे. त्यांनी या दृश्याचे मंत्रमुग्ध करणारे वर्णन केले आणि सांगितले की सुमारे एक मिनिट हे दृश्य असेच राहिले. याचा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला.

तुम्ही याला दैवी चमत्कार किंवा विलक्षण घटना मानण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की ही खगोलीय घटना नसून डोळ्यांची एक युक्ती आहे. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे हा एक ऑप्टिकल भ्रम आहे कारण व्हिडिओ स्तरित काचेच्या खिडकीतून कॅप्चर केला गेला होता. अशा संकल्पनेला “सन डॉग” किंवा “पार्हेलियन” म्हणतात. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणात 22 अंशांच्या कोनात असलेल्या बर्फाच्या क्रिस्टल्सवर पडतो तेव्हा प्रकाशाचे अपवर्तन असे होते आणि अनेक सूर्य असल्याचा भास होऊ लागतो.

हेही वाचा :

तळीरामांना मोठा फटका! दारूच्या किमतीत इतक्या रुपयांनी होणार वाढ

महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेचे आमदार अजित पवारांवर भडकले

लाडक्या बहिणींची फसवणूक, महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; बड्या नेत्याची मागणी