राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(politics) हे आज आळंदीच्या दौऱ्यावर आहेत. वारकरी संप्रदायातील मानबिंदू शांतीब्रह्म ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या 93 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळीमारोती महाराज कुरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शांतीब्रम्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला.
“महाराष्ट्र ही संतांची भूमी. कु-हेकर बाबा आणि ढोक महाराजांचे अभिनंदन. यायला उशीर झाला त्याबद्दल त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम आयुष्यातला सगळ्यात आनंद देणारा आहे. संताचे पूजन यापेक्षा दुसरं भाग्य काय असतं. राजकीय अधिष्ठानापेक्षा संतांचे अधिष्ठान मोठे आहे. ते समाज घडवण्याचे काम करतात. धर्मवीर आनंद दिघेही प्रत्येक हरिनाम सप्त्याला न चुकता जायचे,” अशी आठवण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली.
“आम्ही आजपर्यंत ६०० निर्णय घेतले, अनेक निर्णय माझ्या लाडकी बहीण योजने खाले दबून गेले. मुख्यमंत्री (politics)माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरु केली. एखादी योजना लगेच सुरू करता येत नाही त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. मी सामान्य घरातला मुलगा आहे. आईची काटकसर बघितलेला मुलगा आहे. काही लोक १५०० रुपयात विकत घेता का? लाच घेता का? असं म्हणतात. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना 1500 ची काय किंमत,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
“अनेक वर्षापासून बंद पडलेले प्रकल्प सुरू केले. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीकविमा अशा अनेक योजना आणल्या. 2 वर्षात मी काय काय करायचे. एकनाथ शिंदेला थोडा तरी टाईम देणार का नाही? एकनाथ शिंदे खोटा बोलत नाही. बाळासाहेब ठाकरे सांगायचे शब्द देण्याआधी 10 वेळा विचार करा. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळतो.
लाडकी बहिण योजनेसाठी पुढील 1 वर्षाची तरतूद केलेली आहे. ही ओवाळणी कायम मिळेल. माझ्याकडे कुणी काम घेऊन आला तर त्यांचं विदाऊट फी काम करतो. एव्हढीच अपेक्षा आहे की माझ्याकडे आलेला एकही व्यक्ती खाली हात जाऊ नये. शपथविधीला देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र होतो तो देखील इतिहास घडला. असा इतिहास घडवायला धाडस लागतं, अशी कोपरखळीही मुख्यमंत्र्यांनी मारली.
हेही वाचा:
दीपिकाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!
खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी
पत्नी हॉस्पिटलमध्ये.. बिल भरायला पैसे नव्हते; व्यक्तीला चिमुकल्या बाळाला विकायला लावले