गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या टोळीकडून उद्योगपती मुकेश अंबानी(video) यांच्या डिपफेक व्हिडिओचा वापर करुन फसवणूक करण्याच आली आहे. या व्हिडिओत मुकेश अंबानी हे ‘राजीव शर्मा ट्रेड ग्रुप’ याकंपनी बद्दल उच्चार करत आहेत. या कंपनीमध्ये BCF मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत असल्याचा तो व्हिडिओ आहे.
दरम्यान, या आधीही मार्च महिन्यात अशाच प्रकारे गुंतवणूक कण्याबाबतचा व्हिडिओ(video) सोशल मिडियावर अपलोड करण्यात आला होता. दरम्यान, डॉ. के. के. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मे ते 10 जून दरम्यान जास्त परतावा देण्याच्या नावाखाली संबधित कंपनीत 7 लाखांची गुंतवणूक 16 वेगवेगळ्या खात्यांवर पाठवली आहे.
मात्र, कालंतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पाटील यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसानी अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणूक आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
केजरीवालांना या अटींवर जामीन, आज होणार सुटका
एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश?; अधिकृत प्रतिक्रियाही दिली
मोठी घडामोड; लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी गोंधळ आणि घोषणाबाजी