74 टक्के लोकांची जातनिहाय जनगणनेची मागणी; काँग्रेसने एनडीए सरकारला दिला ‘मूड ऑफ द नेशन’

काँग्रेसने (congress)जातनिहाय जनगणना करण्याची मागणी एकदम जोरदारपणे मांडली आहे. इंडिया टुडेच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील 74 टक्के लोकांना जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, असे वाटते. या सर्वेक्षणाचा हवाला देत काँग्रेसने एनडीए सरकारला जनतेच्या मनातील मूड दाखवला आहे.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सणसणीत टोला लगावत म्हटले आहे की, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर जातनिहाय जनगणना रोखण्याचा विचार केला असेल, तर त्यातला कोणताही प्रयत्न व्यर्थ आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, हिंदुस्थानची 90 टक्के जनता लवकरच या मागणीला समर्थन देईल.

सर्वेक्षणातील निष्कर्ष

इंडिया टुडेच्या सर्वेक्षणानुसार, ऑगस्ट 2024 मध्ये 74 टक्के लोक जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत आहेत, तर फेब्रुवारी 2024 मध्ये ही संख्या 59 टक्के होती. या बदलामुळे जनतेच्या मनातील असलेल्या इच्छेचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते.

राहुल गांधींचा टोलाही

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित संविधान सन्मान आणि संरक्षण कार्यक्रमात जातनिहाय जनगणनेवर जोर दिला. त्यांनी यामध्ये सांगितले की, जातनिहाय जनगणना केल्याने देशातील विविध जातींची सुसंगत माहिती मिळेल आणि समाजातील 90 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व होईल.

त्यांनी म्हटले की, देशातील सर्व जातीय समुदायांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी जातनिहाय जनगणना अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा:

गोकुळाष्टमी स्पेशल: बाल गोपाळांसाठी बनवा खमंग बेसण लाडू – सोपी रेसिपी जाणून घ्या!

सूर्यकुमार यादवला IPL 2025 साठी या संघाकडून मोठी ऑफर: मुंबई इंडियन्सला सोडणार?

पीसीओएसमध्ये जलद वजन कमी करणं धोकादायक: तज्ज्ञांचा सल्ला