पुण्यासह नागपूर, नाशिक, नांदेड, अमरावतीमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज

शिक्षण हक्क कायद्यानुसार 25 टक्के कोटय़ांतर्गत आरटीई प्रवेशाचे ऑनलाइन (online)अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत आरटीईच्या 1 लाख 4 हजार 525 जागांसाठी 92 हजार 805 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. 31 मेपर्यंत आरटीई प्रवेशाचा अर्ज करण्यासाठी मुदत असून येत्या 10 दिवसांत अर्जांचा एक लाखाचा टप्पा पार पडेल, असे चित्र आहे.

पुण्यासह नागपूर, नाशिक, नांदेड आणि अमरावतीमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत, तर सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिह्यातून आले असून येथील आरटीईच्या 293 जागांसाठी 35 विद्यार्थ्यांचेच अर्ज आले आहेत. राज्यातील 9 हजार 136 शाळांमधील 1 लाख 4 हजार 525 जागांसाठी शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.(online) गेल्या महिन्यात राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेचा विचार करता सध्या इंग्रजी मध्यमाच्या शाळांमधील जागांसाठी नव्याने राबवल्या जात असलेल्या प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या चार दिवसांत प्रवेश अर्जाने 92 हजारांचा टप्पा पूर्ण केला असून यात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी https://student. maharashtra.gov.in/admÀortal या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. पालकांना येत्या 31 मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
आरटीई प्रवेश अर्जांची स्थिती

जिल्हा प्रवेश क्षमता प्रवेश अर्ज

पुणे 17,591 20,208

नागपूर 6920 8352

नाशिक 5268 5429

ठाणे 11,356 7555

अमरावती 2369 2679

छत्रपती संभाजीनगर 4441 5553

मुंबई 5670 2892

हेही वाचा :

ठग्स ऑफ पॉलिटिशियन इन महाराष्ट्र

ब्रेकिंग! दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल १५ दिवस तुरुंगात

एप्रिल महिना सिनेरसिकांसाठी ठरणार खास, ३ जबरदस्त चित्रपट येणार भेटीला