मुख्यमंत्री योगींच्या सूचनेनंतर अलिगडमध्ये 94 बेकायदेशीर मदरसे बंद, विद्यार्थ्यांचे प्राथमिक शाळांमध्ये स्थलांतर

उत्तर प्रदेश: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कठोर निर्णयांची (decisions)चर्चा देशभर सुरू आहे. मदरशांच्या नोंदणीविषयीच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत, मुख्यमंत्री योगींनी अधिकारी वर्गाला नोंदणी नसलेल्या मदरशांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. अलिगडमध्ये या आदेशांचे पालन करत, जिल्ह्यातील 94 बेकायदेशीर मदरशांवर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, या 94 मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्या प्राथमिक शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी निधी गोस्वामी यांनी सांगितले की, या सर्वेक्षणात 94 मदरसे नोंदणीकृत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या मदरशांना कोणत्याही अधिकृत मंडळाकडून मान्यता मिळालेली नाही.

गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या सर्वेक्षण प्रक्रियेत, अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणात आलेल्या मदरशांना भेटी देऊन त्यांच्याकडून निधी मिळवण्याचे स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्या मदरशात किती मुले शिकत आहेत, ते अधिकृत आहेत का, या सर्व तपासण्या करण्यात आल्या.

या कारवाईनंतर, सरकारच्या सूचनेनुसार सर्व बेकायदेशीर मदरशांना बंद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उत्तर प्रदेशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अलिगडमधील 94 बेकायदेशीर मदरसे बंद करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

धोनी-विराटची ‘माहिराट’ मैत्री: “जेव्हाही भेटतो तेव्हा आवर्जून गप्पा मारतो”, धोनीने उलगडलं मैत्रीचं गुपित

“पुढचे तीन महिने मला द्या, मी तुम्हाला….”; देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आश्वासन

भारत-श्रीलंकेचा सामना टाय, मग का नाही खेळवली सुपर ओव्हर?