कोल्हापूर जिल्ह्यात 98 बंधारे पाण्याखाली, 147 मार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, पंचगंगा नदीची पातळी 47.5 फुटांवर पोहोचली आहे. अनेक नद्यांना पूर आल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख 25 राज्य मार्ग आणि 123 स्थानिक मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

98 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे राधानगरी धरणातून प्रति सेकंद 7212 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर शहर आणि आसपासच्या भागांमध्ये पाणी साचले असून, नागरिकांची स्थिती बिकट झाली आहे.

सद्यस्थितीत 147 मार्ग बंद झाले आहेत, आणि नद्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. जिल्ह्यातील 7006 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून, 3237 जनावरांचेही स्थलांतर केले गेले आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

कोल्हापूर शहराच्या नजीक पुणे-बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणारे हॉटेल्स, मल्टीपर्पज हॉल आणि गॅरेज पाण्याखाली गेले आहेत. महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे.

सध्या पावसाचा जोर कायम असून महापुराचा धोका वाढला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून सतर्कतेचे आदेश दिले आहेत आणि सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा :

तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनी आमने-सामने; ‘या’ राशी कमावतील चिक्कार पैसा

ब्रेकअपनंतरही अर्जुनला मलायकाची काळजी; इव्हेंटमधील कृतीने वेधलं लक्ष

हार्दिक-नताशाच्या नात्यात नवा ट्विस्ट! घटस्फोटानंतर ‘या’ गोष्टीमुळे सुरु झाला वाद?