लोकसभा निवडणुकीला आता(rupees) अवघे काही दिवस उरले आहेत. या महिन्यात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याबाबतची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. राजकीय पक्ष आपापल्या परीने विजय मिळविण्यासाठी प्रचार करत आहेत. जनतेने आपल्या बाजूने कौल द्यावा म्हणून राजकीय पक्ष आश्वासनाचा पाऊस करत आहेत.
याचदरम्यान लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट(rupees) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जे मतदार लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, त्यांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोगाकडून 350 रुपये कापले जातील.
या पोस्टनुसार, जर कोणत्याही मतदाराने त्याच्या मताधिकाराचा वापर केला नाही तर त्याच्या खात्यातून 350 रुपये कापले जातील. सर्व मतदारांना सक्तीने मतदान करावे लागेल, असे त्यात म्हटले आहे. अन्यथा त्यांच्या खात्यातून 350 रुपये कापले जातील.
मात्र जेव्हा या दाव्याची सत्यता पडताळून पाहिली असता त्यातील सत्य काही वेगळेच असल्याचे समोर आले. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने आपल्या तपासणीत म्हटले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, भारताच्या निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशा बातम्या शेअर करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
दावा: लोकसभा चुनाव में जो मतदाता अपने मताधिकार का प्रयोग नहीं करेंगे, चुनाव आयोग द्वारा उनके बैंक खातों से ₹350 काट लिए जाएंगे। #PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 29, 2024
➡️यह दावा फर्जी है।
➡️@ECISVEEP द्वारा ऐसा कोई निर्णय नहीं लिया गया है।
➡️ऐसी भ्रामक खबरों को शेयर न करें। pic.twitter.com/pW2QUwYqqp
दरम्यान, राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्याचे 7 मे, चौथ्या टप्प्याचे 14 मे आणि पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार आहे. तसेच निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.
हेही वाचा :
धोनीने सिक्स मारला अन् क्लिन बोल्ड झाली ‘मिस्ट्री गर्ल’, थालाची ती दिवाणी कोण?
सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली ‘ही’ धार्मिक चूक
यंदाच्या लोकसभेला आम्ही 16 जागा लढणारच…; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने दंड थोपटले