ठाकरे गटाने आपली उमेदवार यादी जाहीर केली. यात सांगलीतून(seat) डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जात आपली नाराजी बोलून दाखवली. या सगळ्याचे कोल्हापूर मतदारसंघातही पडसाद उमटत असल्याची राजकीय वर्तुळात होत आहे. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.
सांगलीच्या जागेचे पडसाद कोल्हापूरमध्ये नाहीत. कोल्हापूरमध्ये शिवसेना(seat) ताकतीने काम करत आहे. उद्धव ठाकरे देखील शाहू महाराजांकडे येऊन गेले. मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या गेल्या. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीकडून आम्ही अजूनही आशावादी आहोत, असं सतेज पाटील म्हणाले.
कोल्हापुरात ठाकरे गटाने शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. शाहू महाराजांच्या प्रचारावर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. ऑलरेडी आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतीचं व्यक्तिमत्व दिल्लीला पाठवायचं, असा विचार आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून येईल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेसमध्ये काय राहिला आहे. हे सात जूनला महाराष्ट्र बघेल. महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत आहे आणि ताकतीने उभी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद काय आहे हे स्पष्टपणे दिसेल, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
इंडिया आघाडी तयार झाल्यापासून नवीन पर्याय मिळाला आहे. 2019 ची आकडेवारी पाहिली तर काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. यामुळे सर्वांना धरून एक आकडा गाठायचा असं भाजप म्हणत आहे मात्र तो असा टाकताना गाठता येणार नाही. इंडिया आघाडी बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. इंडिया आघाडी भाजपाला पर्याय होऊ शकतो असे लोकांना वाटू लागले आहे. महाराष्ट्राचा जनमत भाजपच्या बाजूने नाही हे भाजपाला समजले आहे. यामुळे ते महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेत आहेत, असं सतेज पाटील म्ह
हेही वाचा :
महिना 50 हजार देऊन हिंदुंना ख्रिश्चन बनवण्याचा प्लान असा फसला
खरंच परिणीती चोप्रा प्रग्नेंट आहे का?, अभिनेत्रीने VIDEO शेअर करत सांगितलं सत्य
अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?