कोल्हापूर प्रतिनिधी : रंकाळा परिसरातील एका रुग्णालयातील(jewelry) घटना.कोल्हापुरात रंकाळा तलाव परिसरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या शालन पाटील वय 80 यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.मात्र मृतदेहावरील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोट्याने लंपास केले. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याबाबत मुलगा अजित पाटील यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
शालन पाटील या आजारी असल्यामुळे त्यांना दोन दिवसापूर्वी रंकाळा (jewelry)तलाव परिसरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या अंगावरील सर्व दागिने नातेवाईकांना काढून घेण्यास सांगितले होते. नातेवाईकांनी दागिने काढत असताना हातातील दोन तोळ्याचे गोठ निघत नसल्यामुळे ते तसेच ठेवले व इतर दागिने काढून घेतले.
शालन यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी हातातील दोन तोळे वजनाचे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचा गोठ नसल्याचे लक्षात आले. याबाबत नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन तसेच कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे मुलगा अजित पाटील यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर कर्मचारी यांचे जाब जबाब घेऊन आरोपीचा शोध घेतला जाईल असे पोलीस निरीक्षक झाडे यांनी सांगितले.
हेही वाचा :
पराभवाची हॅट्ट्रिक झाल्यानंतर हार्दिक या खेळाडूंवर भडकला!
तिसऱ्या कार्यकाळात वीज बिल शून्य, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई : PM मोदी
ईडीचं नो ऑब्जेक्शन! ‘आप’चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर