मुंबई: सर्वसामान्यांच्या घराची पाणीपट्टी, घरपट्टी(bond) थकली की लगेच कारवाई होते. मात्र, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शासकीय बंगल्यांचे लाखो रूपयांचं पाणीबील थकल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय बंगल्याचं एकूण ९५ लाख रूपयांचं पाणी बील थकल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेने ही लोखो रूपयांची थकबाकी वसूल केलेली नाही.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी हा माहितीच्या आधिकारात हा तपशील(bond) मागवला होता. यामध्ये फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच नव्हे तर सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, उदय सामंत या नेत्यांच्या शासकीय बंगल्याचा समावेश आहे. दरम्यान सामान्यांना एक न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय असे चित्र दिसून येत आहे.
कोणत्या नेत्याचे किती बील थकलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – वर्षा – ११ लाख ६९ हजार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नंदनवन – १८ लाख ४८ हजार
दिपक केसरकर – रामटेक -११ लाख ३० हजार
उदय सामंत – मुक्तागिरी – ६ लाख ८३ हजार
सुधीर मुनगंटीवार – पर्णकुटी – ६ लाख ५२ हजार
डॉ. विजयकुमार गावित – चित्रकूट – ५ लाख १९ हजार
अजित पवार – देवगिरी – ४ लाख ३८ हजार
देवेंद्र फडणवीस – मेघदूत – २ लाख ७३ हजार
देवेंद्र फडणवीस – सागर – १ लाख २६ हजार
गुलाबराव पाटील – जेतवन – १ लाख १८ हजार
राधाकृष्ण विखे पाटील – रॉयलस्टोन – ९२ हजार
या मंत्र्यांकडून पाणीबिलाची वसूली मुंबई महानगरपालिका कधी करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात सामायिक शेतीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने केला काकाचा गेम
नारायण राणेंचा पराभव केला, तर श्रीकांत शिंदे अजूनही ‘बच्चा’; संजय राऊत यांचा हल्लाबोल
पती आणि प्रियकर दोघांसोबत राहणार; तीन मुलांच्या आईची विचित्र मागणी, पतीने अमान्य करताच…