भाजपने रावेर मतदारसंघातून रक्षा खडसेंना उमेदवारी(thought leadership) दिली, तर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाकडून चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांनी माघार घेतली. मात्र, भाजपमध्ये रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे अजूनही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’कडून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. स्वत: सुप्रिया सुळे, रोहित पवार त्यासाठी जावळेंच्या संपर्कात असून, त्यामुळेच रावेरचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, असेही सांगितले जात आहे.
रावेर मतदारसंघातून(thought leadership) भाजपने या वेळी सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत लढण्यास नकार दिला. पाठोपाठ त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंनीही त्या विधानसभेची तयारी करत असल्याचे सांगत असमर्थता दर्शवली. त्यामुळे रावेरमधून नेमके कुणाला मैदानात उतरवायचे? असा प्रश्न राष्ट्रवादी (शरद पवार) समोर आजही कायम आहे. राज्यातील अन्य महत्त्वपूर्ण मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर होत असताना रावेरमधील सक्षम उमेदवाराचा शोध अद्याप संपलेला नाही.
खडसे पिता- पुत्रीच्या नकारानंतर जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर विनोद सोनवणे यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, या कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. त्यातून उद्योजक श्रीराम पाटील यांचेही नाव समोर आले. मात्र, अद्यापही निर्णय झालेला नाही. रावेर लोकसभा मतदारसंघ जातीय समीकरणात लेवाबहुल असल्याने व त्या समाजाचा एकमेव प्रतिनिधी राज्यात खासदार म्हणून निवडून जात असल्यामुळे पक्षातर्फे त्या समाजाचा उमेदवार देण्यावरच प्राधान्य दिले जाते.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे अशाच उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यामुळेच पक्षातर्फे मतदारसंघात उमेदवारांचे नाव जाहीर करण्यास विलंब होत आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेले भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी देण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. हरिभाऊ जावळे खासदार असताना शरद पवार आणि त्यांची मैत्री होती. जावळे हे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना शरद पवार त्यावेळी देशाचे कृषिमंत्री होते.
2014 ला हरिभाऊ जावळेंची जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करून भाजपने रक्षा खडसेंना तिकीट दिले होते. त्यावेळीही शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून जावळेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हरिभाऊ ‘हलले’ नाहीत. आता अमोल जावळेंना भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा असताना त्यांना ती मिळू शकली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या समर्थकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा :
Google सर्चसाठी द्यावे लागतील पैसे? कंपनीकडून तयारी सुरु
यंदा KKR पटकावणार IPL 2024 स्पर्धेची ट्रॉफी! असा आहे योगायोग
टेस्लाने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ गाड्यांची निर्मिती; लवकरच भारतात करणार लाँच