धुळवड संपताच सूर्य तळपू लागल्यामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 39 (Water supply)टक्क्यांवर आला आहे. राज्यातील तीन हजारपेक्षा अधिक वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे यंदा धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी 55 टक्क्यांच्या आसपास असलेला धरणांमधील साठा यंदा 39 टक्क्यांवर आला आहे. गतवर्षीपेक्षा ही परिस्थिती भीषण असली तरी राज्य सरकारच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अवर सचिव सुगंधा पवार यांनी दिली.
प्रकल्पांत किती पाणीसाठा?
राज्यातील 138 मोठ्या प्रकल्पांत आता केवळ 39 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 260 मध्यम धरणांमध्ये पाणीसाठा यंदा 44 टक्के इतका आहे. गतवर्षी तो 58 टक्के इतका होता. मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी 56 टक्के असलेला पाणीसाठा आता 19 टक्क्यांवर आला आहे. नाशिक आणि पुणे विभागांतील मध्यम धरणांमध्ये गतवर्षी 59 टक्के असलेला पाणीसाठा आता 43 टक्क्यांवर आला आहे. (Water supply)राज्यातील दोन हजार 994 प्रकल्पांपैकी भीषण परिस्थिती मराठवाड्यातील धरणांमध्ये आहे. मराठवाड्यातील 920 धरणांत गतवर्षी 47 टक्के पाणीसाठा होता. यंदा केवळ 20 टक्के इतकाच आहे. नाशिक आणि पुणे विभागांतील धरणांमध्येही आता केवळ 39 टक्के पाणीसाठा आहे.
वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा
राज्यातील सुमारे 875 गावे आणि दोन हजार 100 वाड्यांवर 950 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच दिवशी केवळ 100 गावांमध्ये पाणीटंचाई होती; तर 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.
मराठवाडा ः 232 गावे आणि 73 वाड्यांवर 385 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पुणे विभाग ः 345 गावे आणि 1,285 वाड्यांवर 258 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
नाशिक विभाग ः 265 गावे आणि 680 वाड्यांवर 275 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
नागपूर विभागात एकही टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही.
अमरावती विभाग ः 17 गावांना 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : धुळवड संपताच सूर्य तळपू लागल्यामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 39 टक्क्यांवर आला आहे. राज्यातील तीन हजारपेक्षा अधिक वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे यंदा धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी 55 टक्क्यांच्या आसपास असलेला धरणांमधील साठा यंदा 39 टक्क्यांवर आला आहे. गतवर्षीपेक्षा ही परिस्थिती भीषण असली तरी राज्य सरकारच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अवर सचिव सुगंधा पवार यांनी दिली.
हेही वाचा :
आरबीआयच्या पतधोरणाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष
माझी मागील १४ दिवसांपासून छळवणूक; अपक्ष उमेदवार भाषणादरम्यान ढसाढसा रडला
महाराष्ट्रात आज १ लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?