आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव दररोज(gold price) बदलत असतो. अशातच धातुच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. अवघ्या दोन दिवसात गुढीपाडव्याचा सण येणार आहे. त्यानंतर लग्नसराईचा काळ सुरु होईल.
गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याच्या(gold price) भावाने ७1 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च महिन्याप्रमाणे पहिल्या चार पाच दिवसांत सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसात सोन्याच्या भावात प्रतितोळा ८५० रुपयांनी वाढ झाली आहे.
लग्नसराईच्या काळात दागिन्यांना अधिक मागणी असते. अशातच एमसीएक्सवर आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांक पातळी गाठली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा-चांदीचा भाव किती जाणून घेऊया.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ७,१२९ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७१,२९० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ८५० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८३,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ८० हजार ९०० प्रति किलोंवर रुपयांनी वाढ झाली आहे.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? ( २४k Gold Rate Today)
मुंबई- ७१,२९० रुपये
पुणे – ७१,२९० रुपये
नागपूर – ७१,२९० रुपये
नाशिक – ७१,३२० रुपये
ठाणे – ७१,२९० रुपये
अमरावती – ७१,२९० रुपये
हेही वाचा :
अल्लू अर्जुनचा एकदम जबरा लूक; ‘पुष्पा २’चे नवीन पोस्टर लॉन्च
हिटमॅन ऑन ‘डॉटर ड्यूटी’, लाडक्या लेकीसाठी रोहित शर्माने असं काही केलं की…