महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडिया(alexa audible) प्लेटफॉर्म एक्सवर नेहमी सक्रीय असतात. एक्स वर ते आपले मत मांडत असतात, तर कधी त्यावर निरनिराळ्या विषयावरील व्हिडिओ पोस्ट करत असतात. आनंद महिंद्रा या सोशल मीडिया साइटवर अनेक आयडियाचं कौतुक देखील करत असतात. काही दिवसापूर्वी आनंद महिंद्रा यांनी एका १३ वर्षाच्या मुलीचं साहस पाहून तिला नोकरीची ऑफर दिलीय. या मुलीने एलेक्साच्या मदतीने लहान मुलीला वाचवलं होतं.
उत्तर प्रदेशच्या बस्ती या जिल्ह्यात राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलीने एलेक्साच्या(alexa audible) मदतीने आपल्या घरात शिरलेल्या माकडाला पळवून लावलं. माकडाला पळवून लावत तिने आपल्या लहान बहिणीला वाचवलं. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीच्या घरात माकड शिरले होते.
त्यामुळे त्या माकडाला घाबरण्यासाठी मुलीने एलेक्साला कुत्र्यांचा भूकण्याचा आवाज काढण्याची कमांड दिली. त्यानंतर एलेक्सा या उपकरणातून कुत्र्याच्या भूकण्याचा आवाज येऊ लागला. कुत्र्याचा आवाज येत असल्याने माकड आवाज ऐकून पळून गेले. या मुलीच्या आयडियामुळे तिने आपल्या १५ महिन्याच्या लहान बहिणीचा जीव वाचवला.
आनंद महिंद्रा यांनी या मुलीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना या मुलीला नोकरीची ऑफर दिलीय. त्याचबरोबर त्यांनी व्हिडिओ पोस्ट करताना तंत्रज्ञानाविषयी आपलं मत मांडले आहे. आपल्या या जगाचा पहिला एकच प्रश्न आहे की, काय आपण टेक्नोलॉजीसमोर गुडघे टेकतो का? का आपण त्याला आपला मार्गदर्शक करत असतो.
या मुलीची कथा आपल्याला याच उत्तर देत आहे. टेक्नोलॉजी नेहमी मानवी टॅलेटला प्रोत्साहन देणारी राहील. या मुलीने घटना घडत असताना केलेला विचार हा खूप असाधरण होता. ती जे केले ते पूर्ण अप्रत्यक्ष जगात नेतृत्त्व करण्याची क्षमता असल्याचं होतं. जर तिला तिचे शिक्षण पूर्ण करून कॉर्पोरेट जगतात सामील व्हायचे असेल, तर मला आशा आहे की @MahindraRise येथे आम्ही तिला आमच्यात सामील करुन घेऊ.”
हेही वाचा :
रेल्वे तिकीटचं नाही तर स्टेशनबाहेर तांदळासह पिठाची स्वस्तात करा खरेदी
“त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्…”; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव
‘मला माफ करा पण, ‘या’ दोन खेळाडूंसोबत…’, रोहित शर्माने सांगितलं हॉटेल रुम शेअरिंगचं सिक्रेट