आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ व्या सामन्यात संजू सॅमसनच्या(umpire) नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने शानदार खेळ करत राजस्थान रॉयल्स संघावर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. दरम्यान या पराभवानंतर राजस्थान रॉयल्स संघावर बीसीसीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
राजस्थान रॉयल्स(umpire) हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने सुरुवातीचे चारही सामने जिंकले. मात्र बुधवारी झालेल्या सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसनवर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघातील गोलंदाज निर्धारित षटक आपल्या वेळेत पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार संजू सॅमसनवर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सामनाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर संजू सॅमसनने आपली चूक मान्य केली आहे. ही त्याची या हंगामातील पहिलीच चूक असल्याने १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. सलग ४ विजयानंतर अखेर गुजरात टायटन्सकडून राजस्थानचा विजयरथ थांबवण्यात आला आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने १९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला.
हेही वाचा :
कोल्हापूर : गोकुळची पूर्ण ताकद लावतो, अध्यक्षांचा थेट मुख्यमंऱ्यांना फोन
PM मोदींना ‘पुतिन’ मॉडेल आणायचंय, हाच मोठा धोका; संजय राऊत यांचा घणाघात
तू सेक्सची निवड कर..; अरबाज खानचा मुलाच्या मित्राला अजब सल्ला, मलायकाची प्रतिक्रिया चर्चेत