महाविकास आघाडीचं(social issues) जागावाटप मंगळवारी ( 9 एप्रिल ) जाहीर झालं. त्यानुसार सांगलीची जागा शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वाट्याला गेली असून चंद्रहार पाटील तेथील उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील अद्यापही लढविण्यास ठाम असून मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. तसेच, कोल्हापुरची जागा श्रीमंत शाहू महाराज यांच्यासाठी सोडल्यानं सांगलीवर हक्क सांगितल्याचा दावा वारंवार ठाकरे गटाकडून करण्यात आला. या वादावर आमदार सतेज पाटील यांनी भाष्य केलं आहे.
“शाहू महाराज उभे राहतील, त्या पक्षाला कोल्हापूरची(social issues) जागा द्यायची, असा विषय होता. शाहू महाराजांनी काँग्रेसकडून उभे राहण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली, असा विषय कधीच नव्हता,” असं सतेज पाटलांनी सांगितलं आहे. ते ‘सकाळ’शी संवाद साधत होते.
कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आल्यामुळे सांगलीचा प्रश्न निर्माण झाला का? या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, “मुळात तसा संबंध जोडणेच चुकीचे आहे. शाहू महाराज उभे राहतील त्या पक्षाला कोल्हापूरची जागा द्यायची, असा विषय होता आणि शाहू महाराजांनी काँग्रेसकडून उभे राहण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली असा विषय कधीच नव्हता. शिवसेनेला हातकणंगलेची जागा दिलेलीच होती आणि तिथे ते लढताहेत, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला संधी नव्हती असे म्हणता येत नाही.”
कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दावा असतना ती तुम्ही काँग्रेसला कशी मिळवली? यावर सतेज पाटलांनी म्हटलं, “कोल्हापूरची जागा आम्ही काही भांडून घेतलेली नाही. लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे. विधानसभेचे तीन आमदार आणि विधान परिषदेचे दोन आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे येणे नैसर्गिक न्यायाला धरून होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासारखे उमेदवार असल्यामुळे सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांच्या उमेदवारीचा आघाडीलाच लाभ मिळणार आहे.”
हेही वाचा :
Jr NTR ‘वॉर २’च्या शूटिंगसाठी मुंबईत दाखल, हृतिक रोशनसोबत करणार ॲक्शन सीन्स
Hyundai Grand i10 नवीन व्हर्जनमध्ये लाँच; जबरदस्त लूक आणि दमदार इंजिन