महाविकास आघाडीकडून आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा उमेदवारांमध्ये(candidates) तब्बल 28 उमेदवार मराठा आहेत. आठ ओबीसी तर आहेत. महाविकास आघाडीकडून एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आलेला नाही. हाच मुद्दा पकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीला मुस्लिम मतदान हवे आहे. मुस्लिम उमेदवार नको, असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार(candidates) दिलेला नाही आणि यावर प्रसार माध्यमे देखील गप्प का आहेत, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल तर दोघांमध्ये काय फरक आहे? प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालतात याबाबत प्रसार माध्यम गप्प का? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपला मुस्लिमांची केवळ मते हवी आहेत पण त्यांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलेले नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीमध्ये आत्तापर्यंत जाहीर झालेल्या जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नऊ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी 6 मराठा, 2 ओबीसी तर 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त काँग्रेसच्या आत्तापर्यंत जाहीर केलेल्या 15 जागांवरील उमेदवारांमध्ये 6 मराठा, 3 ओबीसी, 4 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला संधी दिली आहे. वसेनेतील (ठाकरे गट) 21 पैकी 16 मराठा, 3 ओबीसी, 1 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
हेही वाचा :
अॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन
मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी केली घोषणा?
शरद पवार देणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश