मंडलिक,माने यांचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल करणार

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार(minister) संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मोठे शक्‍तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. गांधी मैदानात सर्व कार्यकर्ते एकत्र येतील. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे आज शक्‍तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री(minister) अजित पवार,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील नेते सहभागी होणार आहेत. आज सकाळी अजित पवार हे कोल्हापूर विमानतळावर दाखल होणार असल्याची माहिती आहे. यावेळी गांधी मैदान ते खानविलकर पेट्रोलपंप या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीची खरी रंगत अर्ज भरल्यानंतर वाढणार आहे. शुक्रवार (ता. १२) ते शुक्रवार (ता. १९) या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मोठे शक्‍तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

गांधी मैदानात सर्व कार्यकर्ते एकत्र येतील. तेथून बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर चौक आणि खानविलकर पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील. दरम्यान, छत्रपती शिवाजी चौक आणि खानविलकर पंप चौक येथे सभा होणार आहे.

या रॅलीमध्ये राज्य नियोजन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजपा नेते समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के. पी. पाटील, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, अशोक चराटी, महेश जाधव, भैय्या माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले जाणार आहेत.

हेही वाचा :

लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के यशासाठी अजित पवार यांची सर्वात मोठी रणनीती

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! 

आमदार आवाडेंच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत