प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला(share) आहे. याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.मराठमोळी प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सध्या प्राजक्ता करिअरसोबतच तिच्या(share) वैयक्तिक आयुष्यातही उंच भरारी घेताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ या नावाचा दागिन्यांचा ब्रँड सुरु केला. त्यासोबतच तिने कर्जतमध्ये फार्महाऊस खरेदी केले. यासाठी प्राजक्ताने कर्ज घेतले आहे. आता तिने कर्जाबद्दल केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
प्राजक्ता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या आयुष्यातील अपडेट सांगत असते. आता प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मराठमोळा साजश्रृंगार करुन व्हिडीओचे शूटींग करताना दिसत आहे. यावेळी तिने साडी, गजरा, दागिने असा लूक केला होता. त्यानंतर ती इंडोवेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळाली.
यात प्राजक्ता ही कपडे धुण्याची पावडर, भांडी घासायचा साबण या जाहिरातीचे शूट करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. यावेळी प्राजक्ताच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. यानंतर तिचे दिवसभरातील काम संपल्यानंतर ती थकून एका खुर्चीवर बसून चहाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. प्राजक्ताने या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील ‘बादल पे पाँव है…’ हे गाणं वापरलं आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘कर्ज फेडायला करावं लागत बाबा’ असे प्राजक्ता माळीने यात म्हटले आहे. त्यासोबतच तिने हे सर्व शूटींग गेल्या आठवड्यातील असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान प्राजक्ता माळी ही सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्यासोबतच प्राजक्ताने पुण्यात नवीन घर खरेदी केलं होतं. तसेच तिने कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक फार्महाऊसही खरेदी केले आहे. ‘प्राजक्तकुंज’ असे तिच्या या फार्महाऊसचे नाव आहे. “स्वप्न साकार… Happy owner of my dream “Farm House”. (डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं.) कर्जत नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”. खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत.. फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या… असे प्राजक्ताने पोस्ट करताना म्हटले होते.
हेही वाचा :
अजित पवारांच्या येण्याने शिंदे गटाला फटका; तीन ते चार जागांवर नुकसान
खासदार दाजीबा देसाई आणि देशातील निच्चांकी मताधिक्य
भाजपच्या इच्छुक उमेदवाराने दिली ठाकरे गटाच्या नवरात्रोत्सवाला भेट; राजकीय चर्चांना उधाण