दिल्ली (new delhi)मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तरुंगात आहेत. तुरुंग प्रशासन केजरीवाल यांना डॉक्टरांचे उपचार घेऊ देण्याची मागणी मान्य करीत नसून, यातून केजरीवाल यांना संपविण्याचा कट रचला आहे, असा गंभीर आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी (२० एप्रिल) पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात(new delhi) आहेत. त्यांचा डाएट चार्ट आणि इन्सुलिनची मागणी याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मोदी सरकार आणि एलजी विनय कुमार सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सौरभ भारद्वाज म्हणाले की, तुरुंगात केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यांना संथपणे मृत्यूच्या दारात धकलले जात आहे.
सौरभ भारद्वाज म्हणाले की, केजरीवाल यांची साखरेची पातळी खूप वाढली आहे. त्यामुळे ते वारंवार इन्सुलिनची मागणी करत आहेत, मात्र त्यांना सुविधा दिली जात नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. साखरेची पातळी वाढल्यामुळे नसा, मूत्रपिंड, डोळे आणि हृदयावर परिणाम होतो. तो कधीही बरा होऊ शकत नाही.
एलजी विनय कुमार सक्सेना यांच्यावर निशाणा साधत सौरभ भारद्वाज म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची किडनी निकामी झाली तर ते परत देऊ शकतील का? तुम्ही त्यांचे यकृत ठीक करू शकत नाही. त्यांचे डोळे ठीक करू शकत नाही. केजरीवाल यांच्या हत्येचा कट तुरुंगात रचला जात असल्याचं पूर्ण जबाबदारीने सांगत असल्याचं सौरभ भारद्वाज म्हणाले आहेत. सौरभ भारद्वाज म्हणाले की, “दोन-चार महिन्यांनंतर केजरीवाल तुरुंगातून बाहेर येतील, तेव्हा त्यांचे अनेक अवयव खराब होतील, असा कट रचला जात आहे.
आप नेत्या आतिशीने सीएम केजरीवाल यांच्या आरोग्याचा अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे. अहवाल शेअर करताना त्यांनी लिहिलंय की , “हे १२ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साखरेच्या पातळीचे रिपोर्ट आहे. इतक्या उच्च साखरेच्या पातळीवर इन्सुलिन न दिल्यास, व्यक्तीचे हळूहळू अवयव निकामी होतात. हे क्रूर सरकार मधुमेही रुग्णांना इन्सुलिन देण्यास नकार देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
…म्हणून अरविंद केजरीवाल यांना अटक; शरद पवारांचा थेट निशाणा
उमेदवारी अर्ज माघारी घ्या अन्यथा निलंबित करणार; काँग्रेसकडून विशाल पाटील यांना कारवाईचा इशारा