पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही, चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक, लेखक अशा तिहेरी भूमिका पेलणारा(decision) कलाकार म्हणून चिन्मय मांडलेकर सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर असल्यानं त्यांना पुन्हा एकदा टीकेला सामोरं जावं लागत आहे. सातत्यानं होणाऱ्या या टीकेमुळं आता चिन्मय मांडलेकर यानं मोठा निर्णय घेतलाय.

गेल्या काही दिवसांत चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा(decision) यांना मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यता आलं. अतिशय असभ्य भाषेतल्या कमेंट्स पाहून चिन्मय आणि त्याची पत्नी नेहा यांनी अनेकदा यावर भाष्य केलं. पण कुटुंबाला होणारा मानसिक त्रास लक्षात घेता चिन्मयनं मोठा निर्णय घेतलाय. चिन्मयनं एक व्हिडिओ शेअर करत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय.

छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो, असं चिन्मयनं त्याच्या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. मी लेखक, दिग्दर्शक , अभिनेता अशा अनेक भूमिका पार पडल्या. छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. पण माझ्या मुलाचं नाव जहांगिर आहे म्हणून आम्हाला अतिशय वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जातंय. एक व्यक्ती म्हणून मला त्याच्या खूप त्रास होतोय.

माझ्या कुटुंबियांना अशा पद्धतीचा मानसिक त्रास होणार असेल तर, मी आज नम्रपणे सांगतो की, इथून पुढं मी ही भूमिका करणार नाही. मी आज पर्यंत सहा चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, पण आता नाही. छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो. असं चिन्मयनं स्पष्ट केलं आहे.

पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नसल्याचं चिन्मयनं जाहीर केल्यानंतर खरं तर त्याच्या चाहत्यांसाठी तसंच इंडस्ट्रीसाठी देखील हा मोठा धक्का आहे. त्यामुळं अनेक सेलिब्रिटींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा :

2009 ची पुनरावृत्ती होणार अन्…; संजय मंडलिक यांचा मोठा दावा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण गरम! राजू शेट्टी यांची कारखानदारांवर जोरदार टीका

प्रचार गीतातून ‘जय भवानी’, ‘हिंदू’ शब्द काढा.. निवडणूक आयोगाचे पत्र; उद्धव ठाकरेंचा दावा