कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील(workers) राजकीय वातावरण तापलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून शाहू महाराज रिंगणात आहेत. तर शिंदे गटाकडून संजय मंडलिक रिंगणात आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु केला आहे. अशातच काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना गर्भित इशारा दिला आहे.
‘मी २५ वर्ष येथे कसलेला पैलवान आहे, माझ्या नादाला लागू नये, अशा शब्दात काँग्रेस(workers) नेते, आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमातील सभेतून महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला. या कार्यक्रमात महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा देताना सतेज पाटील म्हणाले,’तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही.
पण आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला तर बंटी पाटलांसोबत गाठ आहे हे लक्षात ठेवा. तु्म्ही ज्यांच्यासाठी काम करताय, ते निवडणुकीनंतर फोन सुद्धा उचलणार नाहीत. त्यानंतर मात्र मीच आहे हे ध्यानात ठेवा. निवडणुकीपर्यंत सतर्क राहा. काही अडचण आली, तर बंटी पाटील रात्री बारा वाजता काठी घेऊन उभा आहे’.
‘मी सुद्धा 25 वर्ष इथं कसलेला पैलवान आहे. कोणाला कधी चितपट करायचं, हे मला माहीत आहे. येथील कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनो माझ्या नादाला लागू नये, अशा शब्दात सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला.
कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक तर हातकणंगले लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे ही सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :
शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त
कोल्हापुरात दुरंगी, तर हातकणंगलेत चौरंगी लढत; हे उमेदवार असणार रिंगणात
सांगलीतील काँग्रेस नेते शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरणार का?