महिला बचत गटांना महापालिकेतर्फे अर्थसाहाय्य

महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून अर्थ (meaning)साहाय्य करण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होत असतो.
महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून अर्थ (meaning)साहाय्य करण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होत असतो. त्यात महापालिकेमार्फत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. त्यात पुणे महापालिकेमार्फतही विविध योजनांतर्गत महिला बचत गटांना अर्थसाहाय्य करण्यात येते.

बचत गटांसाठी फिरता निधी

पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागाअंतर्गत स्थापन झालेल्या बचत गटांच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या बचत गटांना प्रत्येक सभासदाप्रमाणे एक हजार रुपये इतका फिरता निधी दिला जातो. याशिवाय, जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य एकदाच दिले जाते.

प्रदर्शन व विक्रीसाठी अर्थसाहाय्य

ही योजना नागरवस्ती योजनेमार्फत पुरस्कृत बचत गटातील सभासदांसाठी आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या बचतगटांना किमान एक वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक असून, बचत गटांचा व्यवहार नियमित सुरू असणे अपेक्षित आहे. दरवर्षी साधारणतः एक हजार गट विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होतात. शासनाने किंवा सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शन व विक्रीसाठी येणाऱ्या खर्चाचे ८० टक्के अनुदान किंवा किमान पाच हजार रुपयांपर्यंतचे भाडे या योजनेअंतर्गत देण्यात येते.


कागदी पिशव्या करणाऱ्यांना प्रशिक्षण

बचत गटातील महिलांना कागदी पिशव्या तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अनुदान

एका मुलीवर १० हजार रुपये आणि दोन मुलींवर पाच हजार रुपये प्रमाणे रक्कम युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वैकल्पिक ग्रोथ फंडात १८ वर्षांच्या मुदतीसाठी गुंतविण्यात येणार आहे. ही रक्कम १९ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही. १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आत मुलीचे लग्न केल्यास रक्कम महापालिकेकडे वर्ग करण्यात येईल.

हेही वाचा :

कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली

मराठमोळ्या प्राजक्ताचा वेस्टर्न आऊटफिट लूक पाहून चाहते घायाळ म्हणाले…

मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?