बर्फाने केले डोके गरम; अस्वच्छतेमुळे मळमळ, उलट्या, डोकेदुखी वाढली

‘भर दुपारी उन्हात फिरताना थंड (cold)पाणी कधी मिळेल, असे झाले. त्यामुळे उसाचा रस घेतला. त्यात बर्फ टाकला. त्यानंतर तासाभराने डोके दुखायला लागले. मळमळ सुरू झाली.


पुणे – ‘भर दुपारी उन्हात फिरताना थंड (cold)पाणी कधी मिळेल, असे झाले. त्यामुळे उसाचा रस घेतला. त्यात बर्फ टाकला. त्यानंतर तासाभराने डोके दुखायला लागले. मळमळ सुरू झाली. लगेचच डॉक्टरांकडे गेलो. तुम्हाला रसाने नाही, तर त्यातील बर्फाने त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले…’ सागर गव्हाणे बोलत होते…

ते म्हणाले, ‘रस प्यायल्यानंतर प्रथमच मला त्रास झाला. उन्हाचा चटका जास्त होता. त्यामुळे बर्फ जास्त टाकायला सांगितला. पण, हा बर्फ कुठून येतो, कसा आणला जातो, त्यासाठी कोणते पाणी वापरले जाते याची माहिती न घेता उसाच्या रसात टाकलेल्या बर्फामुळे डोकेदुखी वाढविली आणि एक दिवस आजारपणाची रजा घेऊन घरी बसावे लागले.’

शहरात उन्हाचा पारा चाळिशीपार नोंदला जात आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी अगदी चार-पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका बसतो. कामानिमित्त सातत्याने बाहेर फिरणाऱ्या गव्हाणे यांनी हा अनुभव ‘सकाळ’ला सांगितला.

आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

उन्हाचा चटका वाढल्याने भर दुपारी रस्त्यावर असलेल्या बहुतांश लोकांचे पाय शीतपेये विक्रेत्यांच्या दिशेने वळतात. मात्र, यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण, बर्फ खाल्यानंतर आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संतोष जगताप यांनी नोंदविले.

मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणे अशी सर्रास लक्षणे दिसतात. ‘बर्फ खाल्ला होता का’ असा प्रश्न विचारल्यानंतर ७० टक्के रुग्णांचे उत्तर ‘हो’ असे येते. त्यामुळे बर्फामुळे पुणेकरांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते.
याचे भान ठेवा

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी ताक, सरबत, शीतपेय घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. मात्र, आता आपण काय आणि कुठे पितोय याचे भान नक्की ठेवा, अशी भरही वैद्यकीय तज्ज्ञांनी आपल्या सल्ल्यात घातली आहे.

औद्योगिक बर्फाचे उत्पादन जास्त

शहर आणि परिसरात खाद्य बर्फापेक्षा औद्योगिक बर्फाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची संख्या जास्त आहे. पण, प्रत्यक्षात उन्हाळ्यात खाद्य बर्फाची मागणी वाढते. त्याचा मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश वेळा औद्योगिक बर्फ शीतपेयांच्या दुकानांमध्ये वापरला जातो, अशी माहिती बर्फ उत्पादकांनी दिली.

हेही वाचा :

कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली

मराठमोळ्या प्राजक्ताचा वेस्टर्न आऊटफिट लूक पाहून चाहते घायाळ म्हणाले…

मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?