षटकार-चौकारांचा पाऊस पाडल्यानंतर ऋषभ पंतला मागावी लागली माफी!

24 एप्रिल रोजी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स(ipl match) यांच्यातील सामन्यात ऋषभ पंत जुन्या टचमध्ये दिसला. तो शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला आणि त्याने 43 चेंडूंत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात त्याने 31 धावा ठोकल्या. पण एका षटकारामुळे त्याला माफी मागावी लागली. काय आहे संपूर्ण प्रकरण हे जाणून घेऊया….

ऋषभ पंतने मारलेला षटकार कॅमेरामनला(ipl match) लागला आणि तो जखमी झाला. याच कारणामुळे सामना संपल्यानंतर ऋषभ पंतने कॅमेरामनची माफी मागितली आणि तो लवकर बरा होण्याची आशा व्यक्त केली. पंत म्हणाले, देवाशिष भाई माफ कर. तुला मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, पण तू लवकर बरा हो….

आयपीएल 2024 मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सचा रोमांचकारी पद्धतीने 4 धावांनी पराभव केला. ऋषभ पंतच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सनेही धावांचा शानदार पाठलाग केला पण त्यांना केवळ 224 धावा करता आल्या.

या विजयासह दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. आणि त्यांनी प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जर त्यांनी पुढील 4 सामने चांगल्या नेट रनरेटने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये जाऊ शकतात. तथापि, दिल्ली कॅपिटल्सच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्जला धक्का बसू शकतो, कारण ते दिल्लीच्या फक्त एका स्थानावर आहेत.

हेही वाचा :

 ही माझी शेवटची निवडणूक, नारायण राणेंची घोषणा

सांगलीत विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकांआधीच राज्यातील २१ साखर कारखान्यांना मिळाली कर्जाची गॅरंटी