राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेस नेते(royal suite) आणि आमदार सतेज पाटील, सुषमा अंधारे आणि कोल्हापुरातील छत्रपती घराण्यावर टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला राजेश क्षीरसागर यांनी उत्तर देताना अनेक विषयांवर भाष्य केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेनंतर कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
राजेश क्षीरसागर म्हणाले, “सतेज पाटील घाणेरडे राजकारण(royal suite) करत असतील, तर कोल्हापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही फोटो व्हायरल करू म्हणता, तसं तुमचंदेखील संजय मंडलिक यांच्याकडे काहीही असू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला येणार म्हणून पाटलांचा जळफळाट का होतोय? ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सभा घेतात, त्या-त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतात.”
“छत्रपती घराण्याचा मान कसा राखायचा, हे आम्हाला शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्हीच ठेवला आहे. काँग्रेसच्या नेत्याने आपल्या गळ्यातील उमेदवारीची माळ शाहू महाराज यांच्या गळ्यात घातली,” असा आरोप क्षीरसागरांनी केला.”आम्हाला वाटत होतं, या राजकारणात शाहू महाराज यांनी पडू नये. छत्रपती पद हेच सर्वात मोठं पद आहे. मात्र, आता शाहू महाराज एका पक्षाला बांधले गेले आहेत. त्यामुळे राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणार. शाहू महाराज यांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे,” अशा शब्दांत क्षीरसागर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
“छत्रपती घराण्याचे खरे वारसदार कोण असा प्रश्न केला जातो. कदमबांडेदेखील या गादीवर हक्क सांगतात. त्याबद्दल न्यायालयीन लढाई सुरू आहे. यांचीदेखील चर्चा या ठिकाणी केली जाते. कोल्हापूरचा दसरा महोत्सव अनेक वर्षे बंद होता. या प्रकरणातील केसेस अजूनदेखील चालू आहेत. छत्रपती घराण्याने राजकारणात पडू नये म्हणून याआधी मालोजीराजे आणि संभाजीराजे यांचा कोल्हापूरकरांनी पराभव केला होता. या निवडणुकीत गादीचा अपमान होणार आहे. काँग्रेसनेच गादीचा अपमान केला आहे. हे करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही,” असा समाचार क्षीरसागरांनी घेतला आहे.
“‘एमआयएम’ची एकही शाखा कोल्हापुरात नाही. कोण हे ‘एमआयएम’ वाले? पुन्हा कोल्हापुरात आले तर आम्ही फोडून काढू, आम्हीदेखील हिंदू आहोत,” अशा शब्दांत ‘एमआयएम’ला विरोध करताना बोलत क्षीरसागरांनी सुषमा अंधारे ही, ‘फालतू आणि पेड बाई आहे,” अशी टीका क्षीरसागर यांनी केली.
हेही वाचा :
‘..तर आम्ही भारत सोडू’, दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपने दिला इशारा
लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ…
मोदींची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करणार; समाजवादी पक्षाचा निर्णय