देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी(community) सुरु आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत आहे. मतदानाचा दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अनेक सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत(community) मी नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे. समाजाचा आता नाईलाज आहे. आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे या विषयाच्या बाजूने आहे. त्यांचा विचार करा. जो सगे सोयरे विषयाच्या बाजूने नाही त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या पुन्हा वर येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत. मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे. इथच मराठा जिंकला की, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणावे लागतय. म्हणजे यांना मराठ्यांची प्रचंड भीती आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच, गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. यावर मनोज जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, असे कुणीच कुणाशी करू नये. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. काही जण असे आहेत की, ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालत आहेत. काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान करत आहेत.
मराठा असो किंवा ओबीसी असो असे कुणी नाही केलं पाहिजे, अस नको व्हायला.मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मराठा एकटे दुश्मन आहेत का फक्त? ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत? ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट होत आहे. हा स्टंट असू शकतो. त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
सामाजिक न्यायाची हत्या काँग्रेसकडून केली जाईल….मोदी
सांगलीत ओबीसी नेत्याच्या कारवर शाईफेक अन् चपलांचा हार
निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा