शेअर मार्केटमध्ये(share market) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे सांगून वृद्धाची फसवणूक करणाऱयाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. हिमांशू नायक असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
कांदिवली येथे राहणारे तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात त्याना एका अज्ञात व्यक्तीने त्याना एका ग्रुपमध्ये जोडले. त्या ग्रुपमध्ये शेअर(share market) ट्रेडिंगची माहिती शेअर केली जात होती. ग्रुपमध्ये कोणते शेअर घ्यायचे, विक्री करणे याबाबत सल्ल्ला दिला जात होता.
त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार याने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याने साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली. ठरल्यानुसार त्यांना परतावा मिळाला नाही. परतावाबाबत त्याने विचारणा केली असता त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी हिमांशूला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हिमांशू हा सायबर ठगांना बँक खाते पुरवत असायचा. त्याच्या मोबदल्यात त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळत होती. हिमांशूच्या चौकशीत काही नावे समोर आली आहे. इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा :
महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात
शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत