पंतप्रधान मोदींनी तुळजा भवानीचे दर्शन टाळले, धाराशीव लातूरमोदींचे’पंजापुराण

धाराशीव आणि लातूर येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी(candidates) झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंजापुराण’ वाचले. महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजा भवानीचा आशीर्वाद मोदींनी मागितला, पण दर्शनाला जाण्याचे मात्र टाळले.

दहा वर्षांत आपल्या सरकारने काय केले याबद्दल मिठाची गुळणी धरून मोदींनी काँग्रेसवरच (candidates)टीकेची झोड उठवली. ‘आदर्श डीलर’ अशोक चव्हाण, विमान खरेदीतील गैरव्यवहाराचा कलंक घेऊन फिरणारे प्रफुल्ल पटेल यांच्या साक्षीने त्यांनी भ्रष्टाचार विरोधाची रेकॉर्ड वाजवली. सिंचन, जलयुक्त शिवारची कामे भाजप सरकारने केल्याची थाप मारतानाच त्यांनी सोयाबीन उत्पादकांना अच्छे दिन आल्याचा दावाही केला.

धाराशीव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील आणि लातूर येथील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा झाल्या. दोन्ही सभांमध्ये मोदी यांनी काँग्रेसवरच टीका केली. काँग्रेस सत्तेत आल्यास तुमची बचत, दागदागिने, घर, संपत्ती ताब्यात घेऊन त्यांच्या मतपेढीला देणार आहे, असे मोदी म्हणाले. गेली साठ वर्षे काँग्रेसने मराठवाडय़ाचा केवळ विश्वासघातच केल्याचा आरोपही त्यांनी केला. धाराशीव जिल्हय़ातील शेतकऱयांना पंतप्रधान सन्मान निधीतून 800 कोटी रुपयांची मदत करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
सिंचन, जलयुक्तची कामे आम्हीच केली
काँग्रेसने सिंचन क्षेत्रात कवडीचेही काम केले नाही. गेल्या दहा वर्षांत आम्ही शेतकऱयांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवले. जलयुक्त शिवारमध्ये आम्ही जे काम केले ते सर्वांसमोर आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. सिंचन क्षेत्रातील भाजपच्या कामाचा उल्लेख करताना पंतप्रधान 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा मात्र विसरले


जिन्होने लुटा है, उनको लौटाना पडेगा
भ्रष्टाचाराच्या विरोधात राणा भीमदेवी थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जिन्होनो लुटा है, उनको लौटाना पडेगा’ अशी गर्जना केली. या वेळी धाराशिवात त्यांच्या व्यासपीठावर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले प्रफुल्ल पटेल तर लातुरात अशोक चव्हाण हे उपस्थित होते.

हेही वाचा :

कोल्हापूरात आचारसंहिता पथकाला चकवा देत जावळ, बारसं, वाढदिवसानिमित्त तांबड्या-पांढऱ्यावर ताव

सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली; वंचित आघाडीकडून पाठिंबा जाहीर

हातकणंगले मतदारसंघांत मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर!